Health Tips: 5 Simple things for healthy heart, How to take care of your heart?
निरोगी हृदयासाठी सोपा मंत्र, तज्ज्ञ सांगतात करा ५ सोप्या गोष्टी आणि हृदय जपाPublished:October 1, 2022 01:56 PM2022-10-01T13:56:05+5:302022-10-01T14:02:32+5:30Join usJoin usNext १. हृदयरोगाचा धोका आजकाल प्रत्येकाला आहे. अवघ्या तिशीतच हार्टॲटॅक येणाऱ्या अनेक व्यक्ती आपण आपल्या सभोवती बघत असतो. वयाचा आणि हृदयरोगाचा तसा आता काही संबंध राहिलेला नाही. २. त्यामुळेच तर अगदी तरुण वयापासूनच हृदयाची काळजी घेणं गरजेचं झालं आहे. तरुण वयापासूनच काळजी घेणं सुरू केलं तर म्हातारपणीही हृदय तुम्हाला साथ देईल, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. ३. म्हणूनच तर सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी निरोगी हृदयासाठी सोपा मंत्र सांगितला आहे. रोज या काही गोष्टी आपण पाळल्या तर नक्कीच हृदय रोगापासून दूर राहता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. ४. त्यांनी हृदयासाठी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पारंपरिक पाककृती वापरून घरात जे काही खाद्य पदार्थ तयार होतात, त्यातून शरीराला Good fat मिळतात. त्यामुळे घरचं अन्न खाण्यास प्राधान्य द्या. ५. Air frying पेक्षा deep frying एकवेळ बरे. तसेच तळण्यासाठी तूप किंवा तुमच्या भागात मिळणारे कोल्ड प्रेस्ड ऑईल वापरल्यास अधिक चांगले. ६. व्यायाम हे हृदयासाठी अतिशय उत्तम टॉनिक आहे. त्यामुळे दररोज न चुकता व्यायाम कराच... ७. स्मोकिंग, अल्कोहोल हे हृदयासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे ते टाळाच.. ८. पॅकेज फूड, पोल्यूशन म्हणजेच प्रदुषण आणि बॅड सिटी प्लॅनिंग हे तीन P हृदयासाठी अत्यंत हानिकारक आहेत. ९. या ५ सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच दिल धडकता ही रहेगा... टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सअन्नहृदयविकाराचा झटकाहृदयरोगHealthHealth TipsfoodHeart AttackHeart Disease