निरोगी हृदयासाठी सोपा मंत्र, तज्ज्ञ सांगतात करा ५ सोप्या गोष्टी आणि हृदय जपा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2022 1:56 PM 1 / 9१. हृदयरोगाचा धोका आजकाल प्रत्येकाला आहे. अवघ्या तिशीतच हार्टॲटॅक येणाऱ्या अनेक व्यक्ती आपण आपल्या सभोवती बघत असतो. वयाचा आणि हृदयरोगाचा तसा आता काही संबंध राहिलेला नाही.2 / 9२. त्यामुळेच तर अगदी तरुण वयापासूनच हृदयाची काळजी घेणं गरजेचं झालं आहे. तरुण वयापासूनच काळजी घेणं सुरू केलं तर म्हातारपणीही हृदय तुम्हाला साथ देईल, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात.3 / 9३. म्हणूनच तर सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी निरोगी हृदयासाठी सोपा मंत्र सांगितला आहे. रोज या काही गोष्टी आपण पाळल्या तर नक्कीच हृदय रोगापासून दूर राहता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.4 / 9४. त्यांनी हृदयासाठी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पारंपरिक पाककृती वापरून घरात जे काही खाद्य पदार्थ तयार होतात, त्यातून शरीराला Good fat मिळतात. त्यामुळे घरचं अन्न खाण्यास प्राधान्य द्या.5 / 9५. Air frying पेक्षा deep frying एकवेळ बरे. तसेच तळण्यासाठी तूप किंवा तुमच्या भागात मिळणारे कोल्ड प्रेस्ड ऑईल वापरल्यास अधिक चांगले.6 / 9६. व्यायाम हे हृदयासाठी अतिशय उत्तम टॉनिक आहे. त्यामुळे दररोज न चुकता व्यायाम कराच...7 / 9७. स्मोकिंग, अल्कोहोल हे हृदयासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे ते टाळाच..8 / 9८. पॅकेज फूड, पोल्यूशन म्हणजेच प्रदुषण आणि बॅड सिटी प्लॅनिंग हे तीन P हृदयासाठी अत्यंत हानिकारक आहेत. 9 / 9९. या ५ सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर नक्कीच दिल धडकता ही रहेगा... आणखी वाचा Subscribe to Notifications