Join us   

६ कारणांमुळे हिवाळ्यात वारंवार होते सर्दी... फिट राहण्यासाठी बघा नेमकं काय करायचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 4:14 PM

1 / 8
१. हिवाळ्याची चाहूल लागली की अनेक जणांना सर्दी- खोकला- घसादुखी असा त्रास होऊ लागतो. काही जणांना तर हिवाळ्याचे २- ३ महिने सतत सर्दी असते किंवा नाक चोंदल्यासारखं वाटतं.
2 / 8
२. काही जणांना या दिवसांत वारंवार सर्दी होण्याचा त्रास होतो. गोळ्या- औषधी घेऊन सर्दी बरी झाली की पुन्हा काही दिवसांतच लगेचच नव्याने सर्दी होते. हिवाळ्यात अशी सारखी- सारखी सर्दी होत असेल तर त्यामागे काेणती ५ कारणं असू शकतात याविषयीची माहिती डॉ. विनीता तनेजा यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना दिली.
3 / 8
३. ज्या लोकांना स्मोकिंगचे व्यसन असते अशा लोकांना या दिवसांत वारंवार सर्दी होते. कारण स्मोकिंगमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने कमी होत जाते. शिवाय जे लोक स्मोकिंग करत नाहीत, पण स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींच्या सहवासात असतात, त्यांच्याही रोगप्रतिकारक शक्तीवर त्या धुराचा परिणाम होतो आणि त्यांनाही या काळात लवकर सर्दी- खोकला असा त्रास होऊ लागतो.
4 / 8
४. ज्यांना वारंवार प्रदुषण असणाऱ्या ठिकाणी जावे लागते, त्यांनाही सर्दी- खोकल्याचा त्रास लवकर होतो. अशा लोकांनी प्रदुषणाच्या ठिकाणी जाताना नाक- तोंड पुर्णपणे स्वच्छ कपड्याने गुंडाळावे.
5 / 8
५. स्वत:च्या स्वच्छतेची योग्य काळजी घेतली नाही तर धुळीमुळे, अस्वच्छतेमुळे वारंवार सर्दी होते. त्यामुळे नेहमी कपडे, बेडशीट, टॉवेल, आसपासचा परिसर स्वच्छ असावा. हात देखील वारंवार धुवावे.
6 / 8
६. एखाद्या गोष्टीचा खूप ताण आल्यावर मनावर जसा परिणाम होतो, तसाच परिणाम शारिरीक स्थितीवरही होतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते आणि सर्दी- खोकल्यासह वेगवेगळे संसर्गजन्य आजार चटकन मागे लागतात.
7 / 8
७. अपूरी झोप हे देखील वारंवार सर्दी किंवा कफ होण्यामागचं एक कारण असू शकतं. ज्यांना वारंवार सर्दी होते अशा व्यक्तींनी रात्रीची झोप पुर्ण घ्यावी तसेच दुपारी झोपणे टाळावे.
8 / 8
८. थंडीमुळे काही लोक घराबाहेर जाणं टाळतात. दिवसेंदिवस घरातच असतात. घरातल्या थंड किंवा त्याच त्या कोंदट वातावरणामुळेही सर्दी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो सकाळी थोडं कोवळं ऊन पडल्यावर बाहेरच्या स्वच्छ, मोकळ्या हवेत एक फेरफटका मारून यावा.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजी