1 / 8ब्लॅक कॉफी पिण्याचा ट्रेण्ड सध्या खूप जोरात आहे. तुम्हीही त्या नादात रोजच ब्लॅक कॉफी पित असाल तर हे एकदा वाचाच...2 / 8वजन कमी करण्यासाठी किंवा फिटनेससाठी अनेक जण दूध आणि साखर घालून केलेला चहा किंवा कॉफी पिणं टाळतात. त्यामुळेच हल्ली बरेच तरुण दूध घालून केलेल्या कॉफीपेक्षा ब्लॅक कॉफी पिण्यास प्राधान्य देतात. अगदी त्यांच्या दिवसाची सुरुवातच ब्लॅक कॉफी पिऊन होते. 3 / 8त्यानंतर दिवसभरात ब्लॅक कॉफीचे कित्येक कप रिचवले जातात. पण एवढ्या जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी पिणं आरोग्यासाठी धोकदायक ठरू शकतं. ब्लॅक कॉफी प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात, याविषयीचा अभ्यास टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात सांगितला आहे. 4 / 8ब्लॅक कॉफी खूप जास्त प्रमाणात प्यायल्याने ॲसिडीटीचा त्रास होतो. 5 / 8संध्याकाळी उशिरा ब्लॅक कॉफी घेत असाल तर त्यामुळे रात्री शांत झोप लागत नाही. झोपेचे चक्र बिघडते.6 / 8ब्लॅक कॉफी अतिप्रमाणात प्यायल्याने शरीरातील एड्रेनालाईन वाढते. त्यामुळे अनेकांना एन्झायटीचा त्रास होतो. त्यामुळे एन्झायटीचा त्रास असणाऱ्यांनी शक्यतो ब्लॅक कॉफी पिणं टाळावं.7 / 8ब्लॅक कॉफी प्यायल्याने युरीनचे प्रमाणही वाढते. त्यामुळे अनेकांना डिहायड्रेशनचा त्राससुद्धा होऊ शकतो. त्यामुळे ब्लॅक कॉफी पिण्याची सवय असणाऱ्यांनी पाणी जास्त प्रमाणात प्यावे.8 / 8ब्लॅक कॉफीमध्ये असे काही घटक असतात जे आहारातून मिळणारे कॅल्शियम रक्तात मिसळू देण्यापासून रोखतात. त्यामुळे हाडे ठिसूळ होण्याचा त्रासही अनेकांना होऊ शकतो.