दात किडले, हिरड्या काळपट पडल्या? ४ उपाय, दातांची दुखणी आणि खर्च वाढणार नाही
Updated:January 1, 2025 14:13 IST2024-12-30T16:20:48+5:302025-01-01T14:13:59+5:30
Home Remedies To Get Rid Cavities In Teeth : दातांना कीड लागली असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी मोहोरीच्या तेलात हळद आणि मीठ मिसळून एक पेस्ट तयार करा.

मुलं असो किंवा म्हातारी माणसं. गोड खाल्ल्यानंतर दातांची स्वच्छता करण्यात निष्काळजीपणा केल्यास दातांमध्ये किड लागू शकते. ज्यामुळे दात पूर्णपणे खराब होतात.अशावेळी लोकांना डेंटिस्टकडे जावं लागत आणि दात काढून टाकले जातात. कारण यामुळे दुसरे दातही खराब होण्याचा धोका असतो.
आजी आजोबांनी पूर्वी सांगितलेला हा उपाय करून तुम्ही दातांना लागलेली किड सहज काढून टाकू शकता. एक घरगुती उपाय करून तु्म्ही दातांना लागलेली किड सहज बाहेर काढू शकता.
दातांना कीड लागली असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी मोहोरीच्या तेलात हळद आणि मीठ मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांना लावून ब्रशच्या साहाय्यानं किड काढून घ्या, नंतर ब्रश करा. दिवसातून २ वेळा हा उपाय केल्यास दातांची किड सहज बाहेर येईल आणि दात स्वच्छ होण्यास मदत होईल.
दातांची किड बाहेर काढण्यासाठी तुम्ही तुरटीच्या पावडरचा वापर करू शकता. यात सैंधव मीठ मिसळून पेस्ट तयार करा. नंतर ही पेस्ट दातांना लावून ब्रश करा. असं केल्यानं दातांना लागलेली किड सहज बाहेर निघण्यास मदत होईल.
दातांना किड लागली असेल तर या पासून आराम मिळवण्याासठी तुम्ही लवंगाचं तेल वापरू शकता. हे तेल काही वेळासाठी दातांवर लावून ठेवा. रोज असं केल्यानं दातांची किड निघून जाण्यास मदत होईल आणि दात दुखीच्या वेदनांपासूनही आराम मिळेल.
हिंगाची पावडर दातांना लावून तुम्ही दातदुखीच्या, दात किडन्याच्या त्रासापासून आराम मिळवू शकता.
हा उपाय करण्यासाठी हिंगाची पावडर पाण्यात घालून उकळवून घ्या नंतर कोमट झाल्यानंतर हे पाणी उकळवून या पाण्यानं गुळण्या करा. ज्यामुळे दातांची किड निघून जाण्यास मदत होईल.