Health Tips: दिवसभरात व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिटं; व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी!

Updated:February 28, 2025 14:10 IST2025-02-28T14:01:36+5:302025-02-28T14:10:58+5:30

Health Tips: व्यायाम करायची इच्छा आहे पण वेळच मिळत नाही, असे म्हणणाऱ्यांनी निदान झोपण्यापूर्वी स्वतःसाठी पाच मिनिटं राखीव ठेवायलाच हवीत. ही पाच मिनिटं तुमच्या आयुष्यात आरोग्याचे सेव्हिंग करतील आणि दिर्घआयुष्याची व्याजासकट परतफेडही करतील.

Health Tips: दिवसभरात व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिटं; व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी!

मनुष्य मनाने तरुण असला तरी शरीराने लवकर थकतो. त्यामागे कारणं अनेक प्रकारची असू शकतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाने अकाली वृद्धत्त्व येतं. केस पिकणे, शरीर थकणे, विविध प्रकारच्या व्याधी होणे यामुळे वय कमी असूनही शरीरावर म्हातारपणाच्या खुणा दिसू लागतात. केस काळे करणे, अँटी एजिंग क्रीम लावणे, फेस मसाज करणे असे नानाविध उपचार केले जातात. हे थांबवायचे असेल तर वेळीच दोन उपचार आज रात्रीपासून सुरु करा. तेही झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटं आधी!

Health Tips: दिवसभरात व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिटं; व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी!

आयुर्वेदात असे अनेक उपचार आहेत, ज्यामुळे आपण आपले तन-मन निरोगी ठेवू शकतो. यासाठी दर वेळी आयुर्वेदिक औषधंच घेतली पाहिजेत असे नाही. तर आयुर्वेदिक जीवनशैलीचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश केलात तरीदेखील तुम्ही कायमस्वरूपी निरोगी जीवन जगू शकता.

Health Tips: दिवसभरात व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिटं; व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी!

आयुर्वेदाचा भर केवळ जडीबुटीवर नाही तर आहार-विहारावर देखील असतो. आयुर्वेदानुसार रात्रीचे जेवण तुम्ही झोपण्याच्या तीन ते चार तास आधी घेतले पाहिजे. त्यामुळे झोपेपर्यंत तुमच्या जेवणाचे व्यवस्थित पचन होते आणि पोट हलके राहते. झोप छान लागते. त्याबरोबरच फॉलो करा पुढे दिलेले दोन नियम.

Health Tips: दिवसभरात व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिटं; व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी!

हे नियम अगदी सोपे आहेत. झोपण्यापूर्वी आपल्या बिछान्यावर येऊन वज्रासनात बसावे. तसे जमत नसेल तर सुखासनात अर्थात मांडी घालून बसावे. योग मुद्रा धारण करावी. म्हणजेच अंगठ्यासकट पहिली तीन बोटं जोडून गुडघ्यांवर हात ठेवावे. दीर्घ श्वसन करावे. निरोगी आयुष्यासाठी दीर्घ श्वसन फार महत्त्वाचे आहे. संथपणे श्वास आत घेणे आणि संथपणे श्वास बाहेर सोडणे या क्रियेला दीर्घ श्वसन म्हणतात.

Health Tips: दिवसभरात व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिटं; व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी!

ही क्रिया एसी रूम मध्ये बसून करू नये. स्वच्छ वायू शरीरात जाणे हा त्यामागचा उद्देश असतो. त्यामुळे हे आसन शक्यतो खिडकीसमोर बसून, गॅलरीमध्ये बसून, गच्चीत किंवा खुल्या अंगणात करावे. ज्यांना रात्री तसे करणे शक्य नाही त्यांनी सकाळी उठल्यावर दीर्घ श्वसन करावे. पण लक्षात घ्या, रोज पाच मिनिटे तरी शरीराला दीर्घ श्वसनाचा पुरवठा झालाच पाहिजे. तरच तुम्ही ताजेतवाने, निरोगी, उत्साही आणि दीर्घकाळ तरुण दिसू शकाल.

Health Tips: दिवसभरात व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिटं; व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी!

दीर्घश्वसनाने आयुष्य वाढते. कारण दैनंदिन जीवनात आपण जे श्वसन करतो ते शरीरासाठी अपुरे पडते. शरीराला लागणारा प्राणवायूचा पुरवठा कृत्रिमरीत्या करावा लागू नये, याची पूर्व खबरदारी म्हणजे रोजचा दीर्घ श्वसनाचा सराव. आता पाहूया दुसरा उपाय.

Health Tips: दिवसभरात व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिटं; व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी!

जर रात्रीच्या वेळी बाकीचे झोपले आहेत आणि आजूबाजूच्यांना त्रास होऊ नये म्हणून टाळी वाजवणे शक्य नसेल तर सकाळी उठून हा प्रयोग करा. आणि रात्री दोन्ही तळव्यांना थोडेसे तेल लावा आणि प्रत्येक बोटाचा छान मसाज करा. तसे केल्यानेही रिलॅक्स वाटते. ताण दूर होतो. झोप शांत लागते आणि पूर्ण होते. झोप पूर्ण झाल्यामुळे दिवसभर प्रसन्न वाटते.

Health Tips: दिवसभरात व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिटं; व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी!

दुसरा उपाय असा, की याच पाच मिनिटात दीर्घ श्वसन झाले की दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर मारून मोठ्याने टाळी वाजवा. त्यामुळे तळहातावर स्थित सर्व ऍक्युप्रेशर पॉईंट सक्रिय होतात. आणि शरीरात स्थित असलेले पंचमहाभूत सुरळीत कार्य करतात. मोठ्याने टाळी वाजवण्याने तना-मनावरचा ताण दूर होतो आणि शरीर शिथिल/रिलॅक्स होते.

Health Tips: दिवसभरात व्यायामाला वेळ नाही? झोपण्यापूर्वी द्या पाच मिनिटं; व्हाल निरोगी आणि दीर्घायुषी!

तर आता व्यायामाला वेळ नाही अशी सबब देऊ नका. झोपण्याआधी पाच मिनिटं अवश्य काढा, दिलेले उपाय करा. ताजे, सात्विक आणि घरचे अन्न सेवन करा. मर्यादित जेवा, मर्यादित झोपा. भरपूर काम करा आणि हळू हळू प्रयत्नपूर्वक व्यायामासाठी वेळ काढा. जेणेकरून श्वसनाच्या उपायाला हातभार लागेल आणि तुमचे वय ओळखणे इतरांसाठी एक कोडे वाटू लागेल.