बापरे! टपरीवर डिस्पोजेबल ग्लासमधून चहा पिणं अत्यंत धोकादायक; 'या' गंभीर आजारांना आमंत्रण
Updated:December 28, 2024 15:49 IST2024-12-28T15:30:22+5:302024-12-28T15:49:19+5:30
डिस्पोजेबल कप किंवा ग्लासमध्ये गरम चहा पिणं अत्यंत धोकादायक असू शकतं. यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं.

दिवसातून अनेक वेळा बरेच लोक चहा घेतात. चहाची तलफ आली की प्रत्येक जण चहा प्यायला जातोच. कॉलेजबाहेर किंवा ऑफिसबाहेर जेव्हा आपण चहा पितो तेव्हा तो चहा आपल्याला हमखास डिस्पोजेबल ग्लासमध्ये चहा दिला जातो.
चहा आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. डिस्पोजेबल कप किंवा ग्लासमध्ये गरम चहा पिणं अत्यंत धोकादायक असू शकतं. यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान होतं. तसेच यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. याबाबत जाणून घेऊया...
डिस्पोजेबल कपमध्ये चहा पिण्याचे तोटे
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, डिस्पोजेबल कप पॉलीस्टीरिनपासून बनलेले असतात. गरम चहा प्यायल्यास त्यासोबत हानिकारक पदार्थ शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
चहा प्यायल्याने अनावश्यक थकवा, एकाग्रतेचा अभाव, हार्मोनल असंतुलन इत्यादी समस्या उद्भवू शकतात. डिस्पोजेबल कपमध्ये चहा प्यायल्याने किडनीचं देखील गंभीर नुकसान होऊ शकतं.
गर्भवती महिलांसाठी धोकादायक
डॉक्टरांचे म्हणणं आहे की, डिस्पोजेबल ग्लासेसमध्ये मेट्रोसॅमिन, बिस्फेनॉल ए आणि इतर अनेक केमिकल्स असतात, जी शरीरासाठी धोकादायक असतात. त्यामुळे थकवा, ब्लडप्रेशर, शुगर, थायरॉईड यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. यामुळे गरोदर महिलांचं तसेच बाळाचं नुकसान होऊ शकतं.
कॅन्सरचा धोका
डिस्पोजेबल कपमध्ये गरम चहा प्यायल्याने कॅन्सरचा धोका वाढू शकतो, कारण कपमध्ये असलेले प्लास्टिक आणि इतर केमिकल्स गरम चहासोबत शरीरात पोहोचतात आणि त्यामुळे गंभीर हानी होऊ शकते. त्यामुळे हे टाळावे.
हार्मोनल असंतुलन, पाचन समस्या
डिस्पोजेबल कपमध्ये गरम चहा प्यायल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकतं, कारण कपमध्ये असलेले प्लास्टिक आणि इतर केमिकल्स शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करू शकतात. गरम चहा प्यायल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात.
त्वचा, तोंड आणि घशाच्या समस्या
डिस्पोजेबल कपमध्ये चहा प्यायल्याने त्वचेला हानी पोहोचते. याशिवाय तोंड आणि घशाचा त्रास होऊ शकतो. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार पसरतात.
पर्यावरणाची हानी
डिस्पोजेबल कपमध्ये गरम चहा प्यायल्यानंतर तो कप फेकून दिला जातो, जो पर्यावरणासाठी हानिकारक आहे. त्यामुळे प्रदूषण वाढतं, ज्याचा परिणाम पुन्हा मानवी शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे यापासून दूर राहणं अत्यंत गरजेचं आहे.