Join us   

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्याच्या पायांवर दिसतात ६ खुणा, वेळीच लक्षणं ओळखा-दुर्लक्ष केलं तर जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 3:08 PM

1 / 8
आजकाल कोलेस्टेरॉलची समस्या वाढत चालली आहे. वाढत्या कोलेस्टेरॉलमुळे अनेक समस्या निर्माण होतात. मुख्य म्हणजे आरोग्याच्यानिगडीत समस्येमुळे गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. व्यायामाचा अभाव, तळकट पदार्थ खाणे यासह इतर कारणांमुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. ज्यामुळे नसांमध्ये ब्लॉकेज, हृदयविकाराचा झटका, लठ्ठपणा यांसारख्या समस्या छळतात.
2 / 8
बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर पायांमध्ये विशेष बदल ठळक दिसून येतात. या बदलांना पेरीफेरल आर्टरी डिझीज असे म्हणतात. बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर कोणते लक्षणे दिसून येतात, पाहूयात(High cholesterol signs: Warning signs in legs that means you should visit a doctor immediately).
3 / 8
सीडीसी या वेबसाईटनुसार, 'पेरीफेरल आर्टरी डिझीज झाल्यावर पाय थंड पडतात. कारण रक्ताभिसरणामुळे नसा उबदार होतात. ज्यामुळे पायांमध्ये अनेकदा सुन्नपणा येतो.
4 / 8
पायांमध्ये सूज येण्याचे मुख्य कारण पेरीफेरल आर्टरी डिझीज होऊ शकते. नसा बंद झाल्यावर शरीराच्या खालच्या भागात पुरेसे रक्त पुरवठा होत नाही. ज्यामुळे पाय सुजतात.
5 / 8
पायापर्यंत रक्त पोहोचत नसल्यामुळे, पायांवर जखमा किंवा अल्सर होऊ शकते. अशा जखमा अनेकदा पाय, घोटे, तळवे आणि पायाची बोटे या ठिकाणी निदर्शनास येतात. कारण रक्ताच्या कमतरतेमुळे पेशी, टिश्यू आणि नसा खराब होतात.
6 / 8
कोणतीही शारीरिक क्रिया करताना किंवा विश्रांती घेत असतानाही, पाय दुखू शकतात. यासोबतच पायात सुई टोचत असल्यासारखे देखील वाटू शकते. अशावेळी पायांची हालचाल जास्त करू नका.
7 / 8
बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यावर पायांमध्ये दुखणे, सुन्नपणा, थकवा येणे, मुख्य म्हणजे व्यायाम करताना हा त्रास होऊ शकतो. व्यायामादरम्यान, स्नायूंना अधिक रक्त पुरवठ्याची गरज असते. त्यामुळे व्यायामादरम्यान, पायांमध्ये वेदना जाणवू शकतात.
8 / 8
हाय कोलेस्टेरॉलमुळे पायाच्या नखांमध्ये काही विशेष बदल दिसून येतात. नखं कमी वाढतात, परंतु, नखं जाड व काळपट दिसू लागतात. जर आपल्याला देखील ही लक्षणे दिसून येत असतील तर, वेळीस डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासह आहाराकडे विशेष लक्ष द्या.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य