पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस पास व्हायला त्रास? ५ पदार्थ खा - डब्ब पोट, गॅसेसचा त्रास कमी By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 8:34 AM 1 / 7पोट फुलणं (Bloating), गॅस, ब्लोटींगच्या समस्यांनी अनेकजण त्रासलेले असतात. यामुळे भूक कमी लागणं, गॅस होणं, उलट्यांची समस्या उद्भवते. इतकंच नाही तर पोटदुखी, सतत ढेकर येणं अशा समस्या उद्भवतात. या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे गॅस तयार होतो. (Home remedies for gas and bloating) 2 / 7तुम्ही जे काही खाता यावर पोटाचे आरोग्य अवलंबून असते. स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास गॅस, कॉन्सिपेशनसारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.3 / 7सूज आणि अपचनाचा त्रास कमी करण्यासाठी पुदीना फायदेशीर ठरतो. यामुळे मांसपेशीतील वेदना कमी होतात. पोटावर पेपरमिंट तेल लावून तुम्ही पोटाचे त्रास कमी होऊ शकतात. एक कप पुदीन्याचा चहा सुद्धा पोटाचे त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.4 / 7सूज आणि गॅसच्या समस्येवर आलं उत्तम उपाय आहे. आल्यात अनेक एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे पोटाचे विकार लांब राहतात. आल्यात जिंगबॅन नावाचे एंजाईम असते. ज्यामुळे पचनशक्ती चांगली राहते. 5 / 7जेवल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय पचनाच्या दृष्टीनं अतिशय फायदेशीर आहे. पण काहीजण जेवणानंतरही बडीशेप खात नहीत. बडीशेपेच्या बीयामधून निघणाऱ्या तेलाने पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होते.6 / 7दह्यात प्रोबायोटिक्स असतात. ज्यामुळे हानिकारक बॅक्टेरियाचा विकास रोखता येतो. आतड्यांचे आरोग्य चांगले राहेत. शरीर आतून थंड राहेत सूज, गॅस यांसारख्या समस्या टाळण्यासाठी दही उत्तम पर्याय आहे.7 / 7पपई नैसर्गिक रूपात सूज आणि गॅस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यात पपेन नावाचे एंजाईम्स असतात जे प्रोटीन्स तोडण्यास मदत करतात. ज्यामुळे पचनशक्ती चांगली राहते. यामुळे पचनशक्ती निरोगी राहते. आणखी वाचा Subscribe to Notifications