सारखी ॲसिडिटी, छातीत जळजळ? ८ सोपे घरगुती उपाय, त्रास होईल कमी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 8:09 AM 1 / 10जेवणात थोडं कमी- जास्त झालं किंवा जेवणाच्या वेळा चुकल्या तर अनेकांना लगेचच ॲसिडिटीचा त्रास होतो. छातीत खूप जास्त जळजळ होते. असा त्रास सुरू झाला की मग काहीच सुचत नाही. या त्रासासाठी लगेच एखादी गोळी घेणेही योग्य नसते.2 / 10 म्हणूनच अशावेळी हे काही घरगुती उपाय करून बघा. यामुळे ॲसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ नक्कीच कमी होईल. हे उपाय इन्स्टाग्रामच्या pranabydimple या पेजवर शेअर करण्यात आले आहेत.3 / 10१. ॲसिडीटी, छातीतली जळजळ कमी करण्यासाठी सब्जा अतिशय उपयुक्त ठरतो. यासाठी सब्जा पाण्यात भिजवावा आणि ते पाणी थोडे- थोडे करत प्यावे. 4 / 10२. १ टीस्पून बडिशेपचे दाणे, १ टीस्पून जीरे १ लीटर पाण्यात टाकून उकळावे आणि ते पाणी दिवसभरातून थोड्या थोड्या वेळाने प्यावे. यामुळे ॲसिडिटी कमी होण्यास तर मदत होतेच, पण पचनक्रियाही सुधारते.5 / 10३. ॲसिडिटी कमी करण्यासाठी ताक पिणेही उपयुक्त ठरते. यामुळे पोटात शांत वाटते. ताकामध्ये मिरेपूड आणि कोथिंबीर टाकून घेतल्यास अधिक उत्तम.6 / 10४. थंड दुधामध्ये रोझ सिरप टाकून घेतल्यानेही ॲसिडीटी कमी होण्यास मदत होते. नारळाचं दुधही तुम्ही घेऊ शकता.7 / 10५. छातीतली जळजळ कमी करण्यासाठी टरबूज खाणे किंवा टरबुजाचा ज्यूस पिणेही फायद्याचे ठरते. 8 / 10६. पिकलेली केळी खाल्ल्यानेही ॲसिडिटी कमी होते.9 / 10७. ॲसिडिटी झाल्यावर शक्यतो डाव्या कुशीवर झोपावे. उजव्या कुशीवर झोपल्यास ॲसिडिटी आणखी वाढण्याची शक्यता असते. 10 / 10८. ॲसिडिटी वाढलेली असताना तेलकट, मसालेदार, खारवलेले स्नॅक्स खाणे पुर्णपणे टाळावे. जेवढी भूक असेल त्याच्या ८० टक्केच खावे. त्यामुळेही नक्कीच फायदा होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications