How to Stop Sneezing : सकाळी उठल्या उठल्या खूप शिंका येतात? ६ उपाय, सर्दी, ॲलर्जीचा त्रास होईल कमी By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 12:27 PM 1 / 6जर तुम्हाला वारंवार शिंक येत असतील तर तुमचे नाक दोन्ही बाजूंनी दाबा आणि 5-10 सेकंद बंद करा. यामुळे तुमच्या वाहत्या नाकाला आराम मिळतो आणि शिंका येणे देखील नियंत्रित होते. जेव्हा आपण आपले नाक दोन्ही बाजूंनी दाबता तेव्हा सर्दी नियंत्रणात राहते. 2 / 6एनसीबीआयच्या अहवालानुसार, व्हिटॅमिन सी हे अँटीहिस्टामाइन आहे, जे अनेक लिंबूवर्गीय फळे आणि भाज्यांमध्ये आढळते. ज्या लोकांना ऍलर्जी किंवा इतर कारणांमुळे वारंवार शिंका येतात त्यांनी त्यांच्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा समावेश करावा. 3 / 6कॅमोमाइल चहा केवळ दिवसभराच्या थकव्यानंतर आराम करण्यास मदत करत नाही तर शिंका थांबवण्यास देखील मदत करते. पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध, कॅमोमाइल चहामध्ये अँटी-एलर्जिक गुणधर्म देखील असतात. फ्लूच्या काळात एक कप कॅमोमाइल चहा खूप फायदेशीर ठरू शकतो. त्याचप्रमाणे या चहामुळे शिंकताना खूप आराम मिळतो.4 / 6जर तुम्हाला वारंवार शिंक येत असतील तर तुमचे नाक दोन्ही बाजूंनी दाबा आणि 5-10 सेकंद बंद करा. यामुळे तुमच्या वाहत्या नाकाला आराम मिळतो आणि शिंका येणे देखील नियंत्रित होते. जेव्हा आपण आपले नाक दोन्ही बाजूंनी दाबता तेव्हा सर्दी नियंत्रणात राहते. 5 / 6गरम पाण्याची वाफ घेणं सर्दी दूर पळवण्याचा सोपा उपाय आहे. सर्दी, फ्लूसाठी हा एक प्रभावी उपाय आहे. NIH वर प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार वाफ घेतल्यानंतर सर्दीचा त्रास होण्यास मदत होते. वाफ घेण्यासाठी स्टिमर वापरू शकता किंवा स्टिमरऐवजीन तुम्ही एका भांड्यात पाणी गरम करून डोक्यावर टॉवेल ओढून वाफ घेऊ शकता.6 / 6मधामुळे सर्दी, फ्लू, शिंका दूर होण्यास मदत होते. रोज एक चमचा मध खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. आणखी वाचा Subscribe to Notifications