फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

Updated:April 3, 2025 18:02 IST2025-04-03T17:49:09+5:302025-04-03T18:02:53+5:30

संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि नियमित व्यायामाद्वारे हिमोग्लोबिनची लेव्हल राखणं महत्त्वाचं आहे.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

हिमोग्लोबिन हा लाल रक्तपेशींमध्ये (RBCs) असलेला एक महत्त्वाचा घटक आहे, जो शरीराच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचवतो. जर शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि नियमित व्यायामाद्वारे हिमोग्लोबिनची लेव्हल राखणं महत्त्वाचं आहे. जर हिमोग्लोबिन लक्षणीयरीत्या कमी झालं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि गरज पडल्यास सकस आहार घ्या.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

घरच्या घरीच काही सोपे उपाय करून हिमोग्लोबिनची लेव्हल राखू शकता, ज्यामुळे शरीर निरोगी राहील. यासाठी सर्वप्रथम वयानुसार हिमोग्लोबिनची लेव्हल काय असावी आणि ती नैसर्गिकरित्या कशी वाढवता येईल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

सामान्य हिमोग्लोबिनची लेव्हल वयानुसार बदलते. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी, हिमोग्लोबिनची पातळी १२-१५.५ ग्रॅम/डीएल असावी. तर १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये १३.५ ते १७.५ ग्रॅम/डीएल हिमोग्लोबिन असायला हवं.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

१४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सामान्य प्रमाण १०-१५.५ ग्रॅम/डीएल असतं आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये १२.० ते १५.५ ग्रॅम/डीएल असतं.जर हिमोग्लोबिनची लेव्हल यापेक्षा कमी असेल, तर तुम्ही घरगुती उपाय करा.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर तुमच्या आहारात आयर्न, फॉलिक एसिड, व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

हिमोग्लोबिन तयार करण्यात आयर्न भूमिका महत्त्वाची असते. शरीराची आयर्न गरज पूर्ण करण्यासाठी पालक, मेथी यासारख्या हिरव्या पालेभाज्या खा. बीट आणि डाळिंब दोन्ही रक्त वाढवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. अंजीर आणि खजूरही हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतं.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

संत्री, लिंबू, आवळा आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. गाजर आणि बीटाचा रस प्यायल्याने हिमोग्लोबिन वेगाने वाढतं. शेवग्याच्या पानांमध्ये आयर्न आणि इतर पोषक तत्वं मुबलक प्रमाणात आढळतात.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

फॉलिक अ‍ॅसिड नवीन लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करतं. सोयाबीन, ब्रोकोली, शेंगदाणे खा. संत्री आणि पपई हे देखील फॉलिक एसिडचे उत्कृष्ट सोर्स आहेत.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ शकते. दूध, दही, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खा.

फायद्याची गोष्ट! वयानुसार नेमकं किती असावं हिमोग्लोबिन? वाढवण्यासाठी 'हे' सोपे घरगुती उपाय

गूळ आणि भाजलेले चणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन वेगाने वाढतं. गूळ हा आयर्नचा नैसर्गिक सोर्स आहे आणि चण्यामध्ये प्रोटीन आणि फायबर असतं.