रोज सकाळचा त्रास, पोट साफच होत नाही? चहामध्ये रोज घाला ८ पैकी १ गोष्ट; सकाळी पोट साफ By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2024 12:18 PM 1 / 10आपल्या आहारावर अवलंबून असतं, की आपलं आरोग्य कसं असेल (Health Tips). आहार योग्य असेल तर, गंभीर आजारांचाही धोका कमी होतो (Home Remedy). पण आहार योग्य नसेल तर, सर्वात आधी पोटाचा विकार त्रासदायक ठरतो. पचनसंस्था खराब होते, आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुरु होतो. अनेकदा खाल्लेलं अन्न पोटाला नीट पचवता येत नाही. यामुळे शौचाला गेल्यावर मळ नीट बाहेर पडत नाही. मेयो क्लिनिकच्या मते, आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचास जाणे याला बद्धकोष्ठता मानले जाते(Home remedy to reduce gas in the stomach in the morning).2 / 10जर आपलं सकाळी पोट साफ होत नसेल तर, वेळीच यावर लक्ष द्या. हिवाळ्यात आपण जास्त प्रमाणात चहा पितो. शरीराला उबदार ठेवण्यासाठी चहा मदतगार ठरते. जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, पोटाच्या विकाराने त्रस्त असाल तर, रोजच्या चहामध्ये ८ पैकी १ पदार्थ मिसळा. यामुळे नक्कीच फायदा होईल.3 / 10चहा सर्वांच्याच घरात बनतो. आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी- इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. चहामध्ये आलं घातल्याने पचनक्रिया सुधारते, घसादुखीपासून आराम मिळतो. आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. 4 / 10वेलचीमध्ये शरीरासाठी आवश्यक तेल, अँटिऑक्सिडंट्स, रिबोफ्लेविन आणि नियासिनसारखे जीवनसत्त्वे असतात. चहामध्ये दोन वेलची ठेचून घाला. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अॅसिडिटी कमी होते.5 / 10चहामध्ये दालचिनीचा तुकडा घातल्याने चहा अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉलने समृद्ध होतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी योग्य राहते आणि हृदयही निरोगी राहते.6 / 10चहामध्ये चार-पाच तुळशीची पाने घाला. तुळशीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. 7 / 10हळदीमध्ये कर्फ्यूमिन नावाचे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आढळते. चहामध्ये चिमुटभर हळद घालून प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आणि सांध्यांचे आरोग्यही सुधारते.8 / 10लवंगात युजेनॉल आणि व्हिटॅमिन के, सी नावाचे अँटीऑक्सिडंट आढळतात. ज्यामुळे खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळतो. 9 / 10चहामध्ये साखरेऐवजी गूळ घाला. यामुळे वजन वाढत नाही. खाल्लेलं व्यवस्थित पचतं. यासह ऊर्जा वाढते आणि हिमोग्लोबिनची पातळीही सुधारते. 10 / 10चहामध्ये २-३ ठेचलेल्या काळ्या मिरींचा समावेश केल्याने चयापचय गतिमान होते आणि पचन सुधारते. आणखी वाचा Subscribe to Notifications