कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल

Updated:December 13, 2024 18:40 IST2024-12-13T18:36:30+5:302024-12-13T18:40:57+5:30

कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल

हिवाळा सुरू झाला की घराेघरी सर्दी, खोकला असे त्रास दिसून येतात. बऱ्याचदा तर औषधी घेऊन अनेक जण वैतागून जातात. पण तरी खोकला, छातीत साचलेला कफ कमी होत नाही.

कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल

असा त्रास होत असेल तर कफ, खोकला कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांनी tulsiayurveda या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल

यामध्ये त्यांनी तुळशीचा काढा एका खास पद्धतीने प्यायला सांगितला आहे. यासाठी सगळ्यात आधी पातेल्यामध्ये दिड कप पाणी उकळायला ठेवा आणि त्यामध्ये तुळशीची ६ ते ७ पाने टाका.

कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल

यामध्येच ७ ते ८ मिरे आणि दालचिनीचा अर्धा ते एक इंचाचा तुकडा हे दोन्ही थोडे क्रश करून टाका.

कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल

या पाण्याला ४ ते ५ मिनिटे चांगली उकळी आली की त्यामध्ये अर्धा ते एक चमचा गूळ टाका. गूळ पाण्यात विरघळेपर्यंत पाणी उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करा.

कोरडा खोकला, कफ यामुळे वैतागलात? 'या' पद्धतीने तुळशीचा काढा प्या, दुखणं पळून जाईल

हा काढा गरम असतानाच प्यावा. दिवसातून एकदा किंवा दोन वेळा हा काढा ३ दिवस नियमितपणे प्यायल्यास खोकला, छातीत साचलेला कफ मोकळा होईल, असं डॉक्टर सांगतात.