Join us   

How to control Sugar level : अरे व्वा! डायबिटीसवर रामबाण ठरतोय 'हा' खास पदार्थ; झटपट कमी होईल वाढलेली शुगर लेव्हल, वाचा रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 11:25 AM

1 / 10
डायबिटीस (Diabetes) ही एक आरोग्य स्थिती आहे जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. डायबिटीस वाढला तर इतर आजारही होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते हा आजार आटोक्यात येतो. पण असा कोणताही उपचार नाही, ज्यामुळे त्याला मुळापासून नष्ट करता येईल. अनेक घरातील महिला कामाच्या गडबडीत खाण्यापिण्याकेड दुर्लक्ष करतात त्यामुळे वाढत्या वयात डायबिचील होण्याची शक्यता असते. योग्य व्यवस्थापन न केल्यास डायबिटीस धोकादायक रूप घेऊ शकतो (Diabetes care Tips)
2 / 10
जर तुम्ही डायबिटीस रुग्ण असाल तर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी गुडमारचे सेवन करायला हवे. गुडमार हे मधुमेहावर रामबाण औषध असल्याचे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. गुरमारचा गोडवा कमी केल्यामुळे हे नाव पडले आहे. ही एक जिमनेमा सिल्वेस्ट्रे (Gymnema Sylvestre) नावाची एक वनस्पती, जी मलेरिया आणि सर्पदंशाच्या उपचारात वापरली जाते, ती तिच्या प्रतिजैविक गुणधर्मांसाठी ओळखली जाते. त्याला गुडमार असेही म्हणतात.
3 / 10
Express.UK च्या रिसर्च रिपोर्टनुसार की जिमनेमा आतड्यांमध्ये शोषलेल्या साखरेचे प्रमाण कसे कमी करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत होते. या अभ्यासात 22 रुग्णांच्या नमुन्यावर जिमनेमा अर्कचे परिणाम पाहिले. अभ्यासाच्या लेखकांनी लिहिले की, '22 पैकी 5 मधुमेही रुग्ण त्यांची पारंपारिक औषधे बंद करू शकले आणि केवळ GS 4 सह त्यांचे रक्तातील ग्लुकोज होमिओस्टॅसिस राखू शकले.'
4 / 10
1. जिमनेमा सिल्वेस्ट्रे (Gymnema Sylvestre) हे इन्सुलिन सेन्सिटायझर आहे. या पानांमध्ये रेजिन, अल्ब्युमिन, क्लोरोफिल, कार्बोहायड्रेट्स, टार्टेरिक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड, ब्युटीरिक ऍसिड आणि ऍन्थ्रॅक्विनोन डेरिव्हेटिव्ह असतात. त्यामुळे त्याची पाने चघळल्याने दिवसभर रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.
5 / 10
2. हा उपाय पारंपारिकपणे मलेरिया आणि सर्पदंशाच्या उपचारांसाठी देखील वापरला जातो. हे त्याच्या डायबिटीस विरोधी गुणधर्मांसाठी देखील प्रसिद्ध आहे.
6 / 10
3. हायपोग्लाइसेमिया होऊ न देता ग्लुकोज कमी करण्याची ताकद गुडमारमध्ये आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की जेवणाच्या 30 मिनिटे आधी दिल्यास ते टेस्ट बड्सला ऍनेस्थेटाइज करते आणि भूक आणि गोड खाण्याची इच्छा कमी करते.
7 / 10
4. वजन कमी करण्यासाठीही गुडमार खूप उपयुक्त आहे. यात टाइप 2 डायबिटीसच्या एटिओलॉजी आणि पॅथोफिजियोलॉजीशी संबंधित अनेक घटकांवर एकाच वेळी प्रभाव टाकण्याची क्षमता आहे.
8 / 10
अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की टाइप 2 डायबटिस असलेल्या लोकांनी 18 ते 20 महिन्यांपर्यंत दररोज 400 मिलीग्राम जिमनेमा लीफ अर्काचे सेवन केले त्यांच्या रक्तातील साखरेमध्ये 29 टक्के घट झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अभ्यासात असे दिसून आले की त्याच्या वापरामुळे A1C ची पातळी सुरुवातीला 11.9 टक्क्यांवरून 8.48 टक्क्यांवर आली. संशोधकांचा असा दावा आहे की यामध्ये जिरामिक ऍसिड नावाचे संयुग असते, जे साखरेची चव नियंत्रणात ठेवते.
9 / 10
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, अनियंत्रित डायबिटीस गंभीर असू शकतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील हृदय, किडनी, डोळे आणि ऊतींचे खूप नुकसान होते. व्हेरीवेलहेल्थने एक्सप्रेसला सांगितले की या औषधी वनस्पतीमध्ये दुहेरी क्रिया आहे. गुडमार केवळ साखरेची लालसा कमी करत नाही तर साखर आणि चरबी शोषण्याचे प्रमाण देखील कमी करते. याचे परिणाम 30 सेकंदात सुरू होतात आणि अर्ध्या तासापर्यंत टिकतात.
10 / 10
सायंटिफिक अमेरिकनच्या एका अहवालानुसार, गुडमारमध्ये असलेली संयुगं आतड्यांमधून साखरेचे शोषण कमी करतात आणि इंसुलिनच्या उत्पादनास प्रोत्साहन देतात, ज्यामुळे त्वरित रक्तातील साखर कमी होण्यास मदत होते.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमधुमेहसंशोधन