रोजचाच त्रास- जोर लावूनही पोट साफ होत नाही? ५ उपाय- बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होईल
Updated:March 3, 2025 12:52 IST2025-03-02T09:16:40+5:302025-03-03T12:52:17+5:30

काही जणांना पोटाचा खूपच त्रास असतो. काही केल्या पोट लवकर साफ होत नाही. यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप अशीही कारणं असू शकतात.
अशा लोकांनी काही घरगुती उपाय करून पाहिल्यास त्यांचा बद्धकोष्ठतेचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. त्यासाठी नेमके काय उपाय करायला पाहिजेत याविषयीची माहिती डॉ. वरलक्ष्मी यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
तुमच्या नाश्त्यामध्ये ओव्याच्या पावडर थोडा वापर करा. एखाद्या पदार्थावर टाकून ती खाल्ली तरी चालेल. यामुळे शरीरातील वातदोष कमी होऊन पोट साफ होण्यास मदत होेते.
ज्यांना नेहमीच पोटाचा त्रास होतो त्यांनी गरम अन्न खायला प्राधान्य दिलं पाहिजे. शिळं, थंड अन्न खाऊ नका. यामुळे पोटात वात होऊन गॅस निर्माण होतो आणि अन्न नीट पचत नाही.
जेवत असताना मधेमधे किंवा मग जेवणानंतर बडिशेपाचं पाणी प्या. यामुळे अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
जेवण सावकाश करा. खूप घाईघाईने खाणं टाळा. तसेच प्रत्येक घास बारीक चावून खा. यामुळेही तुमचा पोट साफ होण्याचा त्रास बराच कमी होऊ शकतो.
तुम्ही जर सतत टेन्शनमध्ये असाल, तुम्हाला कोणता ना काेणता ताण असेल तर अशा मनस्थितीतही पोट साफ होत नाही. त्यामुळे मेडिटेशन करा. मन शांत होऊन पाेट साफ होण्यास मदत होईल