Join us

रात्री काही केल्या लवकर झोप येत नाही? ५ टिप्स- झोपेचे बिघडलेले चक्र सुधारेल- शांत झोप येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 15:21 IST

1 / 7
बऱ्याच जणांचे झोपेचे चक्र पार बिघडून गेलेले आहे (how to improve your sleep cycle?). त्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप येत नाही आणि सकाळी डोळे डघडता उघडत नाहीत.
2 / 7
याचा परिणाम तब्येतीवर होतोच. तज्ज्ञ असं सांगतात की अशा पद्धतीने तुमची झोपेची सायकल जर बिघडली असेल तर ती पुन्हा सुरळीत करण्यासाठी हिवाळा हा सगळ्यात उत्तम ऋतू आहे. त्यासाठी तुम्ही पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा. अगदी ७ दिवसांतच झोपेची सायकल सुरळीत होऊन रात्री अंथरुणावर पडताच गाढ झोप लागेल.(5 tips for better and complete sleep in night)
3 / 7
त्यासाठी नेमकं काय करावं, याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ itsprashantdesai या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की शांत झोपेसाठी तुम्ही ज्या खोलीत झोपणार आहात त्याचं तापमान १८ ते २० डिग्री ठेवा.
4 / 7
रात्री झोपण्यापुर्वी तूप थोडं गरम करा आणि त्याने तळपायाला मसाज करा. यामुळे शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होईल.
5 / 7
रात्री झोपण्यापुर्वी गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळेही शरीराचं तापमान कमी होऊन शांत झोप येण्यास मदत होते.
6 / 7
ज्या खोलीमध्ये झोपणार आहात त्या खोलीत पुरेपूर अंधार असला पाहिजे. कारण अंधारात शांत झोप येते. जर असा अंधार तुम्ही खोलीत करू शकत नसाल तर डोळ्यांना स्लिपिंग मास्क लावा.
7 / 7
सलग ७ दिवस या गोष्टी नियमितपणे करून पाहा. शांत झोप लागेल.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स