Join us   

हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? डॉक्टर सांगतात ५ सोपे उपाय, ॲनिमियाचा त्रास कमी होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2024 5:16 PM

1 / 6
बऱ्याच महिलांचं हिमोग्लाेबिन नेहमीच कमी असतं. शरीरातलं लोह कमी असेल तर आपोआपच खूप थकवा, अशक्तपणा येतो (how to increase iron in body?). त्यालाच आपण ॲनिमिया असं म्हणतो.
2 / 6
ॲनिमियाचा त्रास होत असेल म्हणजेच शरीरातलं लोह कमी असेल तर ते वाढण्यासाठी नेमके काय उपाय केले पाहिजे, याविषयीची माहिती आयुर्वेद डॉक्टरांनी dr.manisha.mishra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(4 tips for increasing hemoglobin level)
3 / 6
यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे दररोज एक आवळा नियमितपणे खा. मोरावळा, मुरंबा असे पदार्थही तुम्ही खाऊ शकता. आवळा हा शरीरातील लोह वाढविण्याचा सगळ्यात उत्तम उपाय आहे.
4 / 6
दुसरे म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी लोखंडी कढई, लोखंडी तवा अशा वस्तूंचा वापर करा.
5 / 6
डाळिंब, बीट, पालक, मनुका, गूळ- शेंगदाणे असणारे पदार्थ नियमितपणे खा आणि हे पदार्थ खाल्ल्यानंतर चहा- कॉफी पिऊ नका. कारण चहा- कॉफी प्यायली तर आहारातून मिळणारे लोह चहा- कॉफीमध्ये असणाऱ्या टॅनिन आणि कॅफिनमुळे शरीरात शोषले जात नाहीत.
6 / 6
नियमितपणे व्यायाम करा. योगासनं करा, स्वच्छ सुर्यप्रकाशात फिरायला जा. असे केल्याने आहारातील लोह शरीरात जास्तीतजास्त प्रमाणात शोषून घेण्यास मदत होते.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नअ‍ॅनिमिया