How to know which vitamins, minerals our body needs? Doctors say 5 tips
आपल्या शरीरात कोणत्या व्हिटामिन्सची कमतरता आहे, हे कसं ओळखाल? डॉक्टर सांगतात ५ टिप्सPublished:May 13, 2024 03:12 PM2024-05-13T15:12:44+5:302024-05-13T17:13:04+5:30Join usJoin usNext आपल्या शरीराला कोणत्या व्हिटॅमिन्सची, मिनरल्सची गरज आहे, हे आपलं शरीर आपल्याला स्पष्टपणे सांगत असतं. पण आपण त्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच आता तुम्हाला ही काही लक्षणे जाणवत आहेत का ते पाहा आणि त्यावरून तुमच्या शरीराला कोणत्या घटकांची गरज आहे हे ओळखा. याविषयाची माहिती होमियोपॅथी डॉक्टरांनी dr.smita_peachtreeclinic या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये सगळ्यात पहिले सांगितलेलं लक्षण म्हणजे जर तुमची नखं ठिसूळ असतील, लगेच तुटत असतील तर तुमच्या शरीरात बायोटिन, प्रोटीन आणि लोह कमी प्रमाणात आहेत. ज्यांची त्वचा ऑईली असते त्यांच्या शरीरात झिंक आणि व्हिटॅमिन डी हे घटक कमी प्रमाणात असतात. ज्यांच्या शरीरात ओमेगा ३ आणि व्हिटॅमिन ए ची कमतरता असते त्यांची त्वचा कोरडी असते. लोह आणि प्रोटीन हे दोन घटक कमी प्रमाणात असतील तर त्यामुळे केसांची चांगली वाढ होत नाही. तुमचे केस सतत गळत असतील, खूप पातळ असतील तर तुमच्या शरीरात सेलेनियम, लोह, झिंक आणि प्रोटीन या घटकांची कमतरता आहे. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजीHealthHealth TipsSkin Care TipsHair Care Tips