Join us   

How to Manage Cholesterol : शरीरातलं घातक कॉलेस्टेरॉल कंट्रोलमध्ये ठेवते ही भाजी; जीवघेण्या आजारांपासून लांब राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 5:13 PM

1 / 6
भारतातील लोक खूप तेलकट पदार्थ खातात, त्यामुळे हळूहळू बॅड कोलेस्ट्रॉल त्यांच्या शरीरात जमा होऊ लागते ज्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही एखाद्या विशिष्ट भाजीचा वापर केला तर तुमच्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी होईल. (How to Manage Cholesterol) लसणाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. GIMS हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा येथे कार्यरत असलेल्या प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना आहार आणि कोलेस्टेरॉल कमी करण्याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How can I reduce cholesterol quickly)
2 / 6
लसणामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अमीनो ऍसिडस् आणि ऑर्गोसल्फर संयुगे जसे की ऍलिसिन, अॅझोइन, एस-इथिलसिस्टीन आणि डायलिलसल्फाइड असतात. तसंच त्यामध्ये असलेले सल्फर संयुगे हर्बल गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. यामुळेच हे खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. दररोज कच्चा लसूण खाल्ल्यास रक्तदाबही नियंत्रणात राहतो. (Garlic as bad cholesterol lowering food healthy spice high bp blood pressure oily foods)
3 / 6
1) जर तुमच्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागली असेल, तर त्यासाठी लसूण आणि लिंबू मिसळून प्यावे. असे केल्याने लिपिडची पातळी सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास देखील मदत होते.
4 / 6
2) तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाऊ शकता, असे केल्याने तुम्हाला काही दिवसातच परिणाम दिसून येईल. जर तुम्ही चाचणी केली तर तुमच्या लक्षात येईल की कोलेस्ट्रॉलची पातळी खाली आली आहे.
5 / 6
3) लसणाचा वास खूप तीव्र असतो, याचे कारण म्हणजे लसणात भरपूर प्रमाणात अॅलिसिन असते ज्यामुळे शरीर निरोगी राहते.
6 / 6
4) लसणाचा प्रभाव उष्ण असतो हे लक्षात ठेवा, त्यामुळे उन्हाळ्यात आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन केल्यास आरोग्यालाही त्रास होऊ शकतो.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य