रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध करायचं तर खा ६ पदार्थ; तब्येत राहील उत्तम, वाटेल फ्रेश By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 9:48 AM 1 / 7आपण खात असलेल्या अन्नातील पोषणमूल्य शरीराला पोहचवण्याचे काम रक्ताच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे हे रक्त शुद्ध असणे आवश्यक असते. त्यासाठी वैद्यकीय उपचारांपेक्षा आहारात काही घटकांचा समावेश अतिशय उपयुक्त ठरतो, हे पदार्थ कोणते पाहूया (How To Purify Blood Naturally Home Remedies)...2 / 7बीटामध्ये बीटासायनीन हा घटक असतो जो एक अतिशय पॉवरफुल अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतो. त्यामुळे रक्त शुद्ध होण्याची क्रिया होण्यास याचा फायदा होतो. बीट सलाड म्हणून, कटलेटमध्ये किंवा ज्यूस करुन आहारात घेता येते. 3 / 7आपण गोड पदार्थांत साखरेऐवजी गुळाचा वापर केला तर तो जास्त फायदेशीर ठरतो. लिव्हर स्वच्छ करण्यासाठी किंवा बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी गूळ फायदेशीर असतो. गुळातील लोहामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास तर मदत होतेच पण नियमितपणे गूळ खाल्ल्यास रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. 4 / 7हळदीत असणारे अँटीसेप्टीक गुणधर्म रक्त शुद्ध करण्यास फायदेशीर असतात. त्यामुळे आहारात आवर्जून हळदीचा समावेश करायला हवा. हळदीमध्ये करक्यूमिन कम्पाऊंड नावाचा घटक असतो तो शरीरातील बहुतांश समस्यांसाठी उपयुक्त असतो. 5 / 7तुळस ही अतिशय औषधी वनस्पती असून रक्त शुद्ध होण्यासाठी न चुकता तुळशीची पाने खायला हवीत. तुळशीमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असल्याने शरीराला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठीही तुळस लाभकारी असते. 6 / 7आयुर्वेदात कडुलिंबाचे खूप जास्त महत्त्व सांगितले आहे. चवीला कडू असणारी ही वनस्पती खाल्ल्यास रक्त शुद्ध होण्यास मदत होते. म्हणूनच आपल्याकडे गुढी पाडव्याला आवर्जून कडुलिंबाची चटणी करण्याची पद्धत आहे. रक्तात जमा झालेली टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी कडुलिंब फायदेशीर असतो. 7 / 7लसूण आपण पदार्थाला चव येण्यासाठी वापरत असलो तरी उच्च रक्तदाब, फंगल इन्फेक्शन्स, रक्तशुद्धी यांसाठी लसणाच्या पाकळ्या खाणे उपयुक्त असते. सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ला तरी त्याचा चांगला फायदा होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications