घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

Published:April 17, 2023 03:09 PM2023-04-17T15:09:49+5:302023-04-17T18:19:26+5:30

How to Reduce Body Heat : उन्हाचा तडाखा वाढतो आहे तब्येतीची काळजी घ्या.

घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

सध्या वातावरणात उकाडा वाढला आहे. अशा स्थितीत तब्येतीची काळजी घेण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं फार महत्वाचं आहे. शरीरासाठी ही उष्णता सहन करणे खूप कठीण आहे. त्यामुळे अनेक वेळा लोक आजारीही पडतात. अशा स्थितीत जर तुम्हाला उष्णतेमुळे आजारी पडू नये असे वाटत असेल तर हे घरगुती उपाय अवश्य करून पाहा. (How to reduce body heat)

घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

१) दररोज पुरेसे थंड पाणी प्या. पाणी शरीराला थंड ठेवण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. किमान पाच लिटर पाणी प्या.

घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

२) प्रोबायोटिक युक्त दही हे चवदार तर असतेच, शिवाय शरीराला थंडावाही देते.

घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

३) व्हिटॅमिन सी देणारे पदार्थ खा. लिंबू, संत्री या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी शरीराचे तापमान कमी करते.

घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

४) पुदीना हे आपल्याला उष्माघातापासून वाचवते आणि शरीर थंड ठेवते.

घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

५) लिंबू आणि मीठ मिसळून सॅलेड तयार करा. किंवा तुम्‍ही भाज्या आणि रायतामध्‍ये याचा समावेश करू शकता.

घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

6) मुळा फायबरने समृद्ध आहे. त्याची कोशिंबीर खा. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. मुळ्यामध्ये असलेले पाणी शरीरातील उष्णता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

7) उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडताना डोकं टोपी किंवा स्कार्फनं झाकून घ्या. बाईक चालवत असाल तर सनकोट न विसरता घाला.

घामानं जीव कासावीस होतो? उन्हाळ्यात घराबाहेर पडताना ८ गोष्टी करा; उष्माघाताचा टळेल धोका

८) उन्हाळ्यात दिवसाची सुुरूवात नारळपाण्यानं करा. याशिवाय लिंबू-पाणी, ऊसाचा रस, कलिंगड या पदार्थांचे सेवन तुम्ही करू शकता.