महिलांचं डोकं सारखं का दुखतं? डॉक्टर सांगतात करा ५ गोष्टी- मायग्रेनचा त्रासही होईल कम

Published:May 28, 2024 02:29 PM2024-05-28T14:29:50+5:302024-05-28T16:16:56+5:30

महिलांचं डोकं सारखं का दुखतं? डॉक्टर सांगतात करा ५ गोष्टी- मायग्रेनचा त्रासही होईल कम

महिलांमध्ये डोकेदुखीचे प्रमाण खूप जास्त आहे. बहुतांश जणींचं कायम डोकं दुखतं तर काही जणींना मायग्रेनचा त्रास असतो.

महिलांचं डोकं सारखं का दुखतं? डॉक्टर सांगतात करा ५ गोष्टी- मायग्रेनचा त्रासही होईल कम

साधी डोकेदुखी किंवा मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी कमी करायची असेल तर आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल करणं गरजेचंच आहे. ते नेमके कोणते याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली ही खास माहिती..

महिलांचं डोकं सारखं का दुखतं? डॉक्टर सांगतात करा ५ गोष्टी- मायग्रेनचा त्रासही होईल कम

मायग्रेनचा त्रास कसा कमी करावा, याविषयी न्युरो फिजिशियन डॉ. मकरंद कांजाळकर म्हणतात की वेळच्यावेळी जेवण करणे हा नियम सगळ्यात आधी पाळा. जेवणाच्या वेळा निश्चित करा आणि त्याच वेळेवर जेवण्याचा प्रयत्न करा.

महिलांचं डोकं सारखं का दुखतं? डॉक्टर सांगतात करा ५ गोष्टी- मायग्रेनचा त्रासही होईल कम

दररोज पुरेशी आणि शांत झोप मिळणं हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे रात्रीचं जागरण टाळा. रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा.

महिलांचं डोकं सारखं का दुखतं? डॉक्टर सांगतात करा ५ गोष्टी- मायग्रेनचा त्रासही होईल कम

यासोबतच दररोज नियमितपणे काही प्राणायाम आणि योगाभ्यास करणंही गरजेचं आहे. यासाठी योगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन डोकेदुखीचा त्रास कशाने कमी होऊ शकतो, अशी योगासनं शिकून घ्या आणि ती नियमितपणे करा.

महिलांचं डोकं सारखं का दुखतं? डॉक्टर सांगतात करा ५ गोष्टी- मायग्रेनचा त्रासही होईल कम

मानसिक ताणतणाव टाळण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही गोष्टीचा खूप ताण करून घेण्याची सवय असेल तर ती सोडा. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. विनाकारण लहानसहान गोष्टींचा ताण करून घेतल्यास नाहक डोकेदुखी होते.

महिलांचं डोकं सारखं का दुखतं? डॉक्टर सांगतात करा ५ गोष्टी- मायग्रेनचा त्रासही होईल कम

आपल्या आहारातून पुरेसं पोषण मिळत नसेल, एखाद्या पोषणमुल्याची शरीरात सातत्याने कमतरता होत असेल तरीही त्यातून डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास वाढू शकताे.