Join us   

दात स्वच्छ घासूनही पिवळा थर जमा होतो? नियमित ५ गोष्टी करा, पांढरेशुभ्र चमकतील दात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 12:25 PM

1 / 8
दात आणि हिरड्यांवर दोन्ही बाजूंनी प्लेक जमा होतात. ज्यामुळे दात पिवळे होतात, तोंडातून दुर्गंधी येते तर कधी हिरड्यांमधून रक्त बाहेर येतं. यामुळे दात कमकुवत होतात. दातांचा पिवळा थर ज्याला टार्टर असं म्हणतात. वेळीच दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही तर दातांना किड लागते आणि दात कमकुवत होतात. (Yellow Teeth Solution)
2 / 8
प्लेक काढून टाकण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे दात दिवसातून कमीत कमी २ वेळा घासा. दात घासण्यासाठी हार्ड टुथब्रशचा वापर करू नये. टुथब्रश दर तीन ते चार महिन्यांनी बदलत राहायला हवा. (How to Get Rid of Yellow Teeth)
3 / 8
दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण काढून टाकण्यासाठी ब्रश करण्याआधी फ्लॉस करा. जेणेकरून फ्लॉसिंगमुळे अन्नाचे कण सहज बाहेर पडतील. कारण हेच अन्नाचे कण दातांमध्ये प्लेक साचण्याचं कारण ठरतात.
4 / 8
नारळाचं तेल किंवा तिळाचं तेल घेऊन गुळण्या करा. यामुळे दात मजबूत होतात. दातांना किड लागू नये, हिरड्या चांगल्या राहाव्यात यासाठी आणि प्लेक काढून टाकण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
5 / 8
दातांसाठी बेकींग सोडा हा उत्तम मानला जातो. बेकींग सोडा असलेल्या टुथपेस्टने ब्रश केल्यास प्लेक काढून टाकण्यास मदत होते. हा एक परिणामकारक उपाय आहे. बेकींग सोड्याला नॅच्युरल क्लिंजर म्हटलं जातं.
6 / 8
दातांवर पिवळा थर जमा होऊ नये यासाठी काहीही खाल्ल्यानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा. याव्यतिरिक्त रात्री ब्रश न करता झोपू नका.
7 / 8
दात मजूबत राहण्यासाठी आणि दातदुखीवर आराम मिळवण्यासाठी पेरूच्या पानांचा रस फायदेशीर ठरतो. किंवा पाण्यात पेरूची पानं उकळून या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखीवर आराम मिळेल.
8 / 8
चहा किंवा कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्यामुळे दातांवर पिवळा थर तयार होतो. म्हणून दिवसभरात २ कपपेक्षा जास्त चहा कॉफी घेऊ नका.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स