स्तनांचा आकार लहान-मोठा दिसतो, हे कोणत्या आजाराचं लक्षणं? डॉक्टर सांगतात.... By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 9:24 PM 1 / 7महिलांच्या आरोग्याबाबत अनेक प्रश्न मनात असतानाही खुलेपणानं बोलत नाहीत. (Why Are My Breasts Uneven)लहानपणापासून स्तनांचा विकास होत असतो. तारूण्यात छातीच्या ऊतींचा पुरेपूर विकास झाल्यानंतर साईज लहान-मोठी असल्याचं जाणवतं हे खूपच कॉमन आहे. असं का होतं, हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे का हे समजून घ्यायला हवं. (Is it normal for women breast to be two different size) 2 / 7ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ट्रेन्ड अवॉर्ड विनिंग डॉक्टर तनाया म्हणजेच इंस्टाग्रामवर डॉक्टर क्यूटरस म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरांनी याबाबत अधिक माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या नेहमीच लैंगिक आरोग्याबाबत जागरूकता पसरवणारे व्हिडिओज शेअर करत असतात.3 / 7बर्याच स्त्रियांमध्ये असे घडते की जेव्हा त्यांचे स्तन विकसित होत असतात तेव्हा हार्मोनल बदलांमुळे एक मोठा आणि एक लहान होऊ शकतो. स्तनाच्या आकारात खूप फरक असू शकतो. एका कपच्या आकाराइतका लहान फरक पाहिला जाऊ शकतो. सामान्यतः डावा स्तन मोठा असतो आणि उजवा स्तन लहान असतो, परंतु एखाद्याच्या बाबतीत ते उलट होऊ शकते.4 / 71) प्रेग्नंसीत ब्रेस्ट साईज बदलते. यादरम्यान ब्रेस्ट लहान-मोठे होतात.5 / 7२) ब्रेस्टफिडींग करताना छातीवर दबाव आल्यानं बदल होतो.6 / 7छातीत सिस्ट तयार होणं, ब्रेस्ट ग्रंथी आकुंचन पावणं, याला हायपोप्लासिया म्हणतात. 7 / 7तुमच्या स्तनांमध्ये कमी कालावधीत खूप बदल होत असतील तर ही चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत, आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आणखी वाचा Subscribe to Notifications