Join us

एपिलेप्सी आहे, फिट्स येतात? गैरसमज सोडा, योग्य उपचार - योग्य काळजी - जगता येते समृद्ध आयुष्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2025 13:24 IST

1 / 10
भारताच्या लोकसंख्येपैकी १ टक्का लोक एपिलेप्सी अर्थात फिट्स येणे या आजाराने त्रस्त आहेत. हा आजार शरीरावर नाही तर मनावर आणि आत्मविश्वावरही परिणाम करतो. त्याविषयी गैरसमज टाकून शास्त्रीय माहिती समजून घेतली पाहिजे.
2 / 10
मेंदूमध्ये काही अशा हालचाली होतात ज्यामुळे माणसाला झटके येतात. त्याला मेंदूतील अनियंत्रित विद्युत स्फोट म्हटले जाते. कारण वि‍जेच्या झटक्याप्रमाणेच त्याची तीव्रता असते. हा आजार नियंत्रणात राहू शकतो. काही शस्त्रक्रिया, उत्तम औषधे आता उपलब्ध आहेत. त्यामुळे भीती आणि गैरसमज टाळून उपचार करायला हवे.
3 / 10
या आजाराची लक्षणे लगेच जाणवून येणारी आहेत. तरीही लोकांकडून दुर्लक्ष केले जाते. वेळीच उपचार सुरू न झाल्याने झटका भयंकर स्वरुपाचा येऊ शकतो.
4 / 10
नॅशनल इंस्टिटयूट ऑफ न्यूरोलॉजी अॅण्ड स्ट्रोक या साईटवर सांगितल्याप्रमाणे, हा आजार अनुवंशिकही असू शकतो. मज्जातंतुचे संतुलन गेल्यानेही एपिलेप्सीचा धोका असतो.
5 / 10
जेव्हा एपिलेप्सीचा झटका येतो तेव्हा माणसाचे शरीर निकामी होते. फिट आल्यासारखे होते. शरीराला झटका बसत राहतो. माणसाची शुद्ध हरपून जाते. तोल जाऊन व्यक्ती पडू शकते. बंद दरवाजे, वाहन चालवणे, पोहणे या वेळी झटका आल्यास धोका वाढतो. कारण दुखापत होऊ शकते.
6 / 10
कमी झोप, सतत थकवा, लक्ष विचलित होते. विसरभोळेपणा वाढणे, अशी काही लक्षणे आधी दिसू शकतात. पण सरसकट सर्वांना जाणवतात असे नाही.
7 / 10
उपचार चालू असताना गोळी औषधे चुकविता कामा नये. जागरणे, मद्यपान टाळायला हवे. ट्रिगर समजून घेऊन ते टाळायला हवे.
8 / 10
लहान मुलांमध्ये हा आजार असेल तर योग्य निदान, योग्य उपचार आवश्यक. पालकांची भूमिका यात फार महत्वाची ठरते.
9 / 10
हा आजार ज्या व्यक्तीला होतो त्याला रोजच्या जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कुटुंबियांना तसेच मित्रांनाही काळजी वाटते. मात्र योग्य उपचार, स्वीकार आणि शास्त्रीय दृष्टीकोन असणे यानेच मदत होते.
10 / 10
खरं तर असे काही नाही जे मेंदूला होणारे आजार थांबवू शकत नसलो तरी योग्य उपचार, काळजी, आहार विहार, झोप यामुळे ते नियंत्रणात नक्की ठेवता येतात.
टॅग्स : मानसिक आरोग्यआरोग्यहेल्थ टिप्स