Main symptoms of vitamin d deficiency, how to identify vitamin d deficiency
शरीरात ‘व्हिटामिन D’ची कमतरता आहे हे सांगणारी ५ लक्षणं, तुम्हाला होतोय त्रास? फ्रॅक्चर होण्यापूर्वी तपासा..Published:May 23, 2024 09:10 AM2024-05-23T09:10:27+5:302024-05-23T15:39:30+5:30Join usJoin usNext तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर तुमचे शरीर त्याबाबत सूचना देते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोच कारण त्यातून भविष्यात अनेक गंभीर आजार मागे लागू शकतात. म्हणूनच पाहा ती लक्षणं नेमकी कोणती... पहिलं लक्षण म्हणजे हाडं दुखणे, स्नायूंमध्ये नेहमीच वेदना होणे.. यामुळे अगदी उठता- बसतानाही त्रास होतो. व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर डिप्रेशन आल्यासारखं होतं. विनाकारण चिडचिड होते आणि मानसिक स्वास्थ्य खराब होतं. केस गळणं हे व्हिटॅमिन डी ची कमतरता सांगणारं एक प्रमुख लक्षण आहे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे शरीरावरील जखमा भरायला खूप वेळ लागतो. व्हटॅमिन डी ची कमतरता असणाऱ्या लोकांना सर्दी, ताप असे इन्फेक्शन वारंवार होते. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips