हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

Updated:December 13, 2024 16:37 IST2024-12-13T16:27:29+5:302024-12-13T16:37:09+5:30

ABC ज्यूसध्ये भरपूर जीवनसत्त्वं, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

हिवाळ्यात शरीराची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. तापमानात घट झाल्यामुळे संसर्गासह अनेक आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तसेच खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात.

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

ABC ज्यूसचं सेवन केल्याने अशा परिस्थितीत तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. सफरचंद, बीट, गाजर, थोडं मीठ, आलं आणि लिंबू मिसळून ABC ज्यूस तयार केला जातो.

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

ABC ज्यूसध्ये भरपूर जीवनसत्त्वं, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे हिवाळ्यात शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. थंडीत ABC ज्यूस पिण्याचे ५ जबरदस्त फायदे जाणून घेऊया...

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

ABC ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे सफरचंद आणि गाजरांमध्ये आढळतं, ज्यामुळे इम्यूनिटी वाढते. तसेत शरीराला बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून लढण्यास मदत करतं. हिवाळ्यात सर्दी आणि फ्लूपासून बचाव होतो.

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

हिवाळ्यात त्वचा अनेकदा कोरडी होते. अशावेळी ABC ज्यूसमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेची काळजी घेतात. हे त्वचेला हायड्रेटेड आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हिवाळ्यातही तुमचा चेहरा तजेलदार दिसतो.

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

ABC ज्यूसमधील गाजर आणि बीट दोन्हीमध्ये भरपूर फायबर असतं, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. हा ज्यूस बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यास मदत करतो आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करतो. या ज्यूसमुळे पोट हलकं राहून पचनक्रिया संतुलित राहण्यास मदत होते.

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

हिवाळ्यात, शरीराला अनेकदा थकवा जाणवतो आणि एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते. ABC ज्यूसमध्ये साखरेचा नैसर्गिक स्रोत असतो. ज्यामुळे शरीराला त्वरित एनर्जी मिळते. हा ज्यूस शरीर दिवसभर एक्टिव्ह ठेवण्यास मदत करतो.

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ABC ज्यूस खूप फायदेशीर ठरतो. गाजर आणि बीट सारख्या घटकांमध्ये कॅलरीज कमी असतातच, पण त्यामध्ये भरपूर फायबर देखील असतात, जे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

ABC ज्यूसमुळे मेटाबॉलिज्म वाढतं आणि फॅट बर्न होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच लठ्ठपणा कमी करायचं असल्यास ABC ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो.

हिवाळ्यात निरोगी राहण्याचा मंत्र - ABC ज्यूस; इम्यूनिटी वाढेल अन् लठ्ठपणा होईल कमी

एबीसी ज्यूसचा फायदा व्हावा असं वाटत असेल तर रोज एक ग्लास हा ज्यूस प्या. सकाळी उपाशीपोटी हा ज्यूस प्यायल्यास अधिक चांगला परिणाम होऊ शकतो.