1 / 8दिवसभर काम करुन शरीर अगदी थकून जाते. अशा वेळी जर मसाज करुन मिळाला तर मग मन अगदी प्रसन्न होते. तसेच फ्रेशही वाटते. हातापायाला तर आपण मसाज करतो पण कधी कानाला मसाज करता का?2 / 8मसाज आपण दुखऱ्या अवयवांचा करतो. पाय दुखतात तसेच हात दुखतो. पाठ दुखते. कंबर दुखते म्हणून मग आपण त्या अवयवांचा मसाज करतो. कान हातापायांसारखा दुखत नाही. मात्र कानाला मसाज केल्याने अनेक फायदे मिळतात. 3 / 8हाताच्या बोटांनी कानाला नाजूक मसाज करायचा. फार जोर द्यायचा नाही. हलक्या हाताने मसाज केल्याने शारीरिक आराम मिळतो. तसेच मानसिक शांतताही मिळते. 4 / 8झोपण्याआधी कानाला मसाज केल्याने झोप फार शांत लागते. कानाला मसाज केल्याने डोके शांत होते. तसेच पेशींना आराम मिळतो. स्ट्रेस कमी होतो. डोक्यातील विचार कमी होतात. त्यामुळे झोप छान लागते.5 / 8कानामागचे पॉईंट चोळल्याने डोळ्यांनाही फायदा मिळतो. कानाला मसाज केल्याने रक्ताभिसरण व्यवस्थित होते. त्यामुळे डोळ्यांनाही फायदा होतो. डोळ्यांना आराम मिळतो.6 / 8रोज काही मिनिटांसाठी कानाला मसाज केल्याने पल्स रेट तसेच ब्लड प्रेशल व्यवस्थित राहते. शरीरातील विविध अवयवांना शांतता मिळते.7 / 8डोकेदुखीचा त्रास अनेकांना असतो. डोके एकदा ठणकायला लागले की मग बराच वेळ दुखते. डोकेदुखीवरही कानामागे मसाज करणे उपयुक्त ठरते. कानाच्या मागील पॉईंटना मसाज केल्याने डोक्याला आराम मिळतो.8 / 8दिवसातून दोन ते तीन वेळा असा मसाज स्वतःहून करणे सहज शक्य आहे. अलगद हाताने कानाच्या पाळ्या तसेच कानामागचे पॉईंट प्रेस करायचे. हा मसाज नक्कीच फायद्याचा ठरेल.