दुधाचा चहा प्यायल्याने हमखास होतात हे ५ त्रास; आरोग्यावर किती भयानक परिणाम होतो पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 16:02 IST
1 / 7बरेच लोक सकाळची सुरूवात गरमगारम दुधाच्या चहाने करतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्याचा तब्येतीवर चुकीचा परिणाम होतो. तरीसुद्धा दूधाचा चहा पिणं सोडत नाहीत. सकाळी रिकाम्यापोटी दुधाचा चहा प्यायल्याने काय नुकसान होते ते समजून घेऊ.2 / 7दुधाचा चहा सकाळी प्यायल्याने पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होतो. कारण चहामध्ये कॅफिन आणि टॅनिन असते ज्यामुळे पोटातील एसिडीटी वाढते3 / 7दुधाचा चहा प्यायल्याने पोटात गॅस होतो, पोटात जळजळ आणि पचनांच्या समस्या उद्भवतात म्हणूनच सकाळी उठून कधीच चहाचे सेवन करू नका. 4 / 7सकाळी दूधाचा चहा प्यायल्याने शरीराची एनर्जी लेव्हल थोड्यावेळासाठी वाढते. पण उर्जा कमी होते. म्हणूनच दूधाचा चहा सकाळी पिऊ नये. यामुळे तुम्हाला थकवा, सुस्ती किंवा आळस वाटू शकतो.5 / 7दूधाचा चहा प्यायल्याने वजन वेगाने वाढते कारण दूधाच्या चहात साखर आणि कॅलरीज अधिक असतात. ज्यामुळे वजन वाढू शकतं. 6 / 7जर तुम्ही चहा पिण्याचे शौकिन असाल तर यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकते. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिणं टाळा. ज्यामुळे तुमचे ब्लड प्रेशर अचानक वाढणार नाही. हार्ट हेल्थसाठी हे धोकादायक असू शकते. 7 / 7 सकाळी दुधाचा चहा प्यायल्याने झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते. कारण दुधाच्या चहात कॅफेन असते जे मेंदूला जागृत ठेवते. जर तुम्ही संध्याकाळी उशीरा चहा प्यायलात तर रात्री लवकर झोप येत नाही.