Join us   

महिलांनी रक्तदान करण्याचे ९ फायदे, गैरसमज-अफवांवर विश्वास न ठेवता बिनधास्त करा रक्तदान कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2024 7:37 PM

1 / 10
'रक्तदान हेच श्रेष्ठ दान' दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी ऐज्छिक रक्‍तदान दिन (National Voluntary Blood Donation Day) साजरा करण्‍यात येतो. रक्‍तदानाचे महत्त्व, रक्‍तदानाची आवश्‍यकता याविषयी जनजागृती करण्यात येते(National Voluntary Blood Donation Day :why women should donate blood regularly.9 benefits of blood donation).
2 / 10
National Voluntary Blood Donation Day दिवस सर्वप्रथम १ ऑक्टोबर १९७५ रोजी इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अ‍ॅण्ड इम्युनो हिमॅटोलॉजी या संस्थेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
3 / 10
महिला - पुरुष दोघे रक्ददान करु शकतात. पण महिला रक्तदान करण्यात पुढाकार घेत नाहीत. कारण काही महिलांचा असा समज आहे, मासिक पाळीनंतर शरीरात रक्त कमी होते, आणि रक्तदान केल्याने रक्ताची कमतरता भासू शकते.
4 / 10
भारतात पुरुष ३ महिन्यातून एकदा, तर महिला ४ महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतात. मात्र, महिलांमध्ये असलेल्या गैरसमजामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यास, रक्ताचा साठा वाढू शकेल. त्यामुळे महिलांनीही आवश्यक असलेल्या चाचण्या करून रक्तदान करायाल हवे.
5 / 10
रक्तदान केल्यानंतर अशक्तपणा येत नाही. आपण आजारी पडत नाही. प्रत्येक सुदृढ व्यक्ती दर तीन महिन्याने रक्तदान करू शकतो. रक्तदान केल्यानंतर नवीन रक्त तयार होते. ज्यामुळे एक उर्जा मिळते. त्यामुळे रक्त कमी होईल, मी अशक्त होईल, हा गैरसमज बाळगू नये.
6 / 10
रक्तदान करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यामुळे शरीर फिट राहते. मात्र, जर आपण कोणत्याही विशिष्ट आजाराने ग्रस्त असाल तर, तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच रक्तदान करावे.
7 / 10
रक्तदान केल्याने हेमोक्रोमॅटोसिस या विकाराची जोखिम कमी होऊ शकते. हेमोक्रोमॅटोसिस म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये शरीरात लोहाचे शोषण जास्त प्रमाणात होते. नियमित रक्तदान केल्याने लोहाचे शोषणाचे प्रमाण कमी होते. यासह हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
8 / 10
शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असणे म्हणजे कर्करोगाला आमंत्रण आहे. नियमित रक्तदान करून आपण शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकता. ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
9 / 10
रक्तदान केल्यानंतर शरीरातील पेशी ४८ तासांमध्ये पुन्हा कार्यान्वित होतात. पुन्हा नव्याने रक्तपेशी तयार होतात. रक्तदानात गमावलेल्या सर्व लाल रक्तपेशी ३० ते ६० दिवसांच्या कालावधीत बदलल्या जातात. त्यामुळे रक्तदान केल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
10 / 10
रक्तदानामुळे अतिरिक्त कॅलरीजही बर्न होतात आणि तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.
टॅग्स : रक्तपेढीहेल्थ टिप्सआरोग्य