गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा

Updated:December 21, 2024 14:28 IST2024-12-21T12:03:19+5:302024-12-21T14:28:26+5:30

गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा

बऱ्याचदा असं होतं की आपण आईस्क्रिम किंवा फ्रिजमध्ये ठेवलेला एखादा थंड पदार्थ किंवा गरम पदार्थ खाल्ला तर दातांना लगेच झिणझिण्या येतात. दात ठणकतात. असे दात हळूहळू किडायला सुरुवात होते.(natural remedies for cavities and weak teeth)

गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा

म्हणूनच दात किडू नये म्हणून काही पदार्थ नियमितपणे खाणं गरजेचं आहे (5 superfood for healthy teeth). हे पदार्थ लहान मुलांनाही खायला द्यावेत, जेणेकरून त्यांचे दात किडणार नाहीत, खराब होणार नाही (how to keep teeth strong and healthy?). ते पदार्थ नेमके कोणते याविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ डॉक्टरांनी drsaleem4u या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा

डाॅक्टरांनी सांगितलेला सगळ्यात पहिला पदार्थ आहे लवंग. जेवण झाल्यानंतर एखादी लवंग अवश्य चावून खा. लवंगमध्ये असणारे गुणधर्म दातांचं ठणकणं कमी करण्यासाठी मदत करतात.

गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा

पेरूच्या पानांमध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल पदार्थ दातांसाठी उत्तम आहेत. त्यामुळे जेवण झाल्यावर पेरुची एक- दोन पानं चावून खावीत.

गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा

आपल्याकडे फार पुर्वीपासून कडुलिंबाच्या काड्या चावून दात स्वच्छ केले जातात. कारण कडुलिंबाच्या काडीमुळे दातांचा पिवळेपणा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा

गाजर, मुळा, सफरचंद अशा क्रंची भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळेही दात स्वच्छ होण्यास मदत होते.

गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा

तुळशीची ३ ते ४ पाने दररोज चावून खा. तुळशीच्या पानांमध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक दात निरोगी ठेवण्यास मदत करतात.