Join us   

राजमा खाण्याचे ९ फायदे, केसांसह हृदयासाठी गुणकारी- तब्येतीलाही भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2022 8:24 PM

1 / 10
राजमा खाण्याचे शौकीन आपल्याला अनेक ठिकाणी मिळतील. राजमा पोषक द्रव्यांनी परिपूर्ण आहे. त्यात सर्वाधिक फायबर आणि प्रथिने असतात. याशिवाय लोह, तांबे, फोलेट, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के यासारखे पौष्टिक पदार्थ आढळतात. एका अभ्यासानुसार 100 ग्रॅम राजमामध्ये सुमारे 350 कॅलरी आणि 24 ग्रॅम प्रथिने मिळतात.
2 / 10
राजमा खाल्ल्याने आपल्याला भरपूर प्रमाणावर ऊर्जा मिळते. कारण राजमामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळून येते. जे शरीरातील चयापचय आणि ऊर्जा वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. राजमा खाल्ल्याने शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत होतो.
3 / 10
राजमामध्ये गुड कॅलरीज असतात. जे आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. दुपारच्या जेवणाला आपण राजमा सुपचे सेवन करू शकता. यातील पोषक तत्वे शरीराला योग्य कॅलरीज देते.
4 / 10
किडनी बीन्समध्ये असलेले फायबर शरीरातील चयापचय व्यवस्थित ठेवते. राजमा कार्बोहायड्रेट्स कमी करते, ज्यामुळे रक्तातील साखर कमी होते.
5 / 10
राजमा शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. किडनी बीन्समध्ये असलेले फायबर वजन नियंत्रित ठेवते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.
6 / 10
किडनी बीन्समध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम व्यतिरिक्त, प्रोटीन आणि फायबर रक्तदाब नियंत्रित ठेवतात, तसेच हृदयाचे ठोके सामान्य ठेवतात. राजमामधील पोषक तत्वे संपूर्ण हृदयाचे संरक्षण करते.
7 / 10
किडनी बीन्समध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट कर्करोगापासून बचाव करते, यासह मुक्त रॅडिकल्सचे संरक्षण करते, तसेच व्हिटॅमिन पेशींचे संरक्षण करते.
8 / 10
राजमा खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो यासह स्मरणशक्तीही वाढते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन के मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. याशिवाय यामध्ये असलेले मॅग्नेशियम देखील मायग्रेनची समस्या दूर करते. आठवड्यातून एकदा राजमा खाल्ल्याने ही समस्या दूर होते.
9 / 10
राजमाचे सेवन तुमच्या केस आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळून येते जे केसांची योग्य निगा राखतात. व्हिटॅमिन-सी देखील आपल्या त्वचेसाठी उत्तम आहे, याने त्वचा तजेलदार बनते.
10 / 10
राजमामध्ये कॅल्शियम, बायोटिन आणि मॅंगनीज असते जे हाडे, नखे आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे हाडे मजबूत होतात, नखे चमकदार होतात आणि लवकर तुटत नाहीत. त्याचप्रमाणे केस मजबूत होतात.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स