Join us

गायीचे तूप जगात भारी! कुठल्याच ब्यूटी ट्रिटमेंटची गरज नाही, ‘असे’ वापरा तूप, येईल रुप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2025 07:50 IST

1 / 11
आई आजीचे घरगुती उपाय कायम सर्वोत्तमच असतात. कितीही महागातील ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरली तरी घरगुती वर्षानुवर्षे चालत आलेल्या उपायांना तोड नाही.
2 / 11
स्वयंपाकघरामध्ये एक फेरी मारल्यावर असे आढळून येईल की अनेक पौष्टिक, आरोग्यदायी तसेच त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ आपल्या घरात पडून असतात. त्यांचा वापर आपण योग्य पद्धतीने करत नाही.
3 / 11
तूप शरीरासाठी प्रचंड फायदेशीर असते. तूप खाणे म्हणजे पौष्टिक आहाराचा भाग आहे. साजूक तूप तर आपण वापरतोच मात्र गायीचे तूप तुम्ही वापरता का?
4 / 11
गायीच्या तुपामध्ये अनेक गुणधर्म असतात. त्वचेसाठी तर हे तूप म्हणजे वरदानच आहे. गायीचे तूप भरपूर औषधी असते. शक्यतो रोजच्या आहारामध्ये हे तूप वापरले जात नाही. मात्र इतर पद्धतींनी ते वापरता येऊ शकते.
5 / 11
गायीच्या तुपामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात. शरीराला गरजेचे असलेले हेल्दी फॅट्स या तुपामध्ये असतात. तसेच या तुपामध्ये अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. इतरही अनेक गुणधर्म असतात.
6 / 11
हे तूप वापरल्याने त्वचेवरील डाग जातात. त्वचा छान मऊ होते. चेहर्‍याला, हाताला, पायाला, तळव्याला या तुपाने मसाज करायचा.
7 / 11
गायीच्या तुपामुळे हाडे मजबूत होतात. तुपाचा वापर खाण्यासाठी करू शकता. मसाज करण्यासाठी करू शकता
8 / 11
महिलांसाठी हे तूप फार फायदेशीर ठरते. कारण हार्मोन्सचे संतुलन सुरळीत राहावे यासाठी हे तूप गुणकारी आहे. त्यामुळे महिलांनी चमचाभर गायीचे तूप वापरायलाच हवे.
9 / 11
आजकाल डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी विविध प्रॉडक्ट्स वापरली जातात. मात्र शरीर डिटॉक्स करण्यासाठी गायीचे तूप हा उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. शरीरातील सगळी घाण बाहेर काढण्यासाठी हे तूप मदत करते.
10 / 11
वजन कमी करण्यासाठी या तुपाचा कमालीचा उपयोग होतो. रोज चमचाभर गायीचे तूप खाल्याने पोटाचे आजारही बरे होतात. तसेच पचनही अगदी छान होते.
11 / 11
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही हे तूप औषधी आहे. दृष्टी सुधारते तसेच डोळ्यातून पाणी येणे, डोळे झोंबणे, आदी समस्याही बंद होतात.
टॅग्स : आरोग्यत्वचेची काळजीहेल्थ टिप्सहोम रेमेडी