मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

Published:July 12, 2024 09:02 AM2024-07-12T09:02:42+5:302024-07-12T09:05:01+5:30

मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

आजच्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी मुलांना शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या सशक्त असणं खूप गरजेचं आहे. पण याच्या नेमकं उलट होत आहे. (parenting tips for boosting immunity of kids)

मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

हल्लीची मुलं तासनतास मोबाईल पाहात बसतात. मैदानी खेळ विसरले आहेत. अभ्यास, ट्यूशन, क्लास यांच्या ओझ्याखाली दबली आहेत. शिवाय त्यांचं जंकफूड, पॅकफूड खाण्याचं प्रमाणही खूप वाढलं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन ते वारंवार आजारी पडत आहेत. म्हणूनच मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना या काही सवयी आवर्जून लावा. (how to make your kids physically strong and fit)

मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे मुलांची हाडं बळकट करण्यासाठी त्यांना दूध पिण्याची सवय लावा. दूधामध्ये कोणत्याही विकतच्या पावडर टाकून देणे कटाक्षाने टाळा. दुधासोबतच दही, तूप, पनीर असे दुग्धजन्य पदार्थही द्या.. (5 habits that can improve bone health of your kids)

मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

मुलांना कोवळ्या सुर्यप्रकाशात फिरण्याची, एखादा खेळ खेळण्याची सवय लावा. यामुळे व्हिटॅमिन डी त्यांना पुरेशा प्रमाणात मिळेल.

मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

मुलांना लहानपणापासूनच थोडाफार योगा करायला लावा. त्यामुळे शरीर लवचिक राहण्यास मदत होईल.

मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

तिळातून मिळणाऱ्या कॅल्शियम, फॉस्फरस या दोन्ही गोष्टी हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे त्यांच्या पोटात दररोज एखादा चमचा तीळ कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जाईल, याची काळजी घ्या.

मुलांची हाडं होतील दणकट आणि शरीर पोलादी, फक्त ५ सवयी लावा, मुलं होतील सुदृढ, सशक्त

मुलांना मैदानी खेळ खेळण्याची सवय लावा. या गोष्टी केल्या तर आपोआपच मुलांची हाडं बळकट, मजबूत होतील. मुलं सशक्त, सुदृढ राहतील.