मेनोपॉजमुळे शांत झोप नाही- डिप्रेशन येतं? पुजा माखिजा सांगतात ४ पदार्थ खा- मेनोपॉज होईल सुसह्य By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2024 5:00 PM 1 / 7पाळी येण्यापुर्वी शरीरात जसे बदल होत असतात, तसेच बदल पाळी जाताना म्हणजेच मेनोपॉजच्या (menopause) वेळीही होत असतात. अनेक जणींना मेनोपॉजदरम्यान खूप त्रास होतो.2 / 7शरीरात जर मॅग्नेशियमची कमतरता (magnesium deficiency) असेल तर त्यामुळे मेनोपॉजचा त्रास वाढतो. आपल्याकडे जवळपास ८० टक्के महिलांना मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मेनोपॉजचा त्रास होतो.3 / 7मॅग्नेशियम देणारे पदार्थ आहारात असू द्या. यामुळे मेनोपॉज सुसह्य होईल, असं सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ पुजा माखिजा सांगतात. (magnesium rich food for giving relief during menopause)4 / 7मेनोपॉजदरम्यान अनेक जणींना रात्री शांत झोप येत नाही. काही जणींना सारखी जाग येते तर काही जणींना मध्यरात्र उलटून गेली तरी झोपच येत नाही. मेनोपॉजदरम्यान असा झोपेचा त्रास होत असेल तर त्यासाठी आहारातलं बदामाचं प्रमाण वाढवा.5 / 7मुडस्विंग आणि डिप्रेशन हा त्रासही बहुतांश महिलांना मेनोपॉजदरम्यान होतो. त्यासाठी भोपळ्याच्या बिया खाणे हा एक उत्तम उपाय आहे.6 / 7मेनोपाॅजनंतर अनेकजणींना हृदयविकार होण्याची भीती असते. त्याचा धोका टाळण्यासाठी आहारातले पालकाचे प्रमाण वाढवा.7 / 7हाडं ठिसूळ होण्याचा त्रासही मेनोपॉजनंतर अनेक महिलांमध्ये दिसून येतो. म्हणून हाडं बळकट ठेवण्यासाठी नियमितपणे चिया सीड्स खा. आणखी वाचा Subscribe to Notifications