Quick house cleaning hacks : फक्त २ मिनिटात किचन, बाथरूममधील ड्रेनेजचा दुर्धंग होईल दूर; ७ टिप्स, घर नेहमी राहील फ्रेश, स्वच्छ Published:March 6, 2022 02:46 PM 2022-03-06T14:46:25+5:30 2022-03-06T15:41:15+5:30
Quick house cleaning hacks : खाद्यपदार्थांचा कचरा, खरकटं, अडकल्यानं बेसिन, बाथरूमच्याा सिंकमध्ये बरीच घाण जमा होते. जास्त घाण जमा झाल्यानं काही दिवसांनी त्याचा दुर्गंध यायला सुरूवात होते. (Why is there a bad smell coming from kitchen sink?) घरातला कानाकोपरा, फरशी, भिंती याची कितीही साफसफाई केली तरी पुन्हा घर खराब व्हायला वेळ लागत नाही. घराची साफसफाई करणे हे काही सोपं काम नाही (Easy Home cleaning Hacks) अर्थात, घर व्यवस्थित सांभाळणे हे एखाद्या मोठ्या कामापेक्षा कमी नाही. घरातील स्वयंपाकघरात तुलनेने जास्त पसारा आणि अस्वच्छता असते. (How to get rid of the smell in bathroom sink?) कारण प्रत्येक सेकंदाला किचनमध्ये आपलं काही ना काही काम अडतं.(Image Credit- Insider)
खाद्यपदार्थांचा कचरा, खरकटं, अडकल्यानं बेसिन, बाथरूमच्याा सिंकमध्ये बरीच घाण जमा होते. जास्त घाण जमा झाल्यानं काही दिवसांनी त्याचा दुर्गंध यायला सुरूवात होते. (Why is there a bad smell coming from kitchen sink?) अन्नाचे उरलेले तुकडे स्वयंपाकघरातील सिंकमध्येच राहतात आणि ते हळूहळू ते ठिकाण दुर्गंधीयुक्त बनवतात. तसेच बाथरुममध्ये केस, घाण, साबण इत्यादी साचल्याने ड्रेनेज होलला दुर्गंधी येऊ लागते. (7 easy and cheap ways to make your kitchen and bathroom drainage smell good)
आईस क्यूब
कोणत्याही प्रकारच्या ड्रेनेज पाईपसाठी ही उपयुक्त टीप ठरू शकते. बर्फाचे तुकडे आणि मीठ दोन्ही एकत्र मिसळून एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया तयार करतात ज्यामुळे ड्रेनेज पाईप्स साफ होतात. तुमच्याकडे बर्फाचे तुकडे असल्यास, ड्रेनेज पाईपमध्ये काही बर्फाचे तुकडे टाका आणि त्यावर अर्धा कप रॉक मीठ घाला. यानंतर, 5-10 सेकंद थंड पाणी त्यातून वाहू द्या. तुमचा ड्रेनेज पाईप खूप लवकर साफ झाल्याचे तुम्हाला दिसून येईल. स्वयंपाकघरातील सिंक पाईप स्वच्छ करण्यासाठी ही एक चांगली युक्ती सिद्ध होऊ शकते.
संत्र्याचे साल
लिंबूवर्गीय वास खूप शक्तिशाली असतात आणि ड्रेनेज पाईप्सचा वास कमी करण्यासाठी उत्कृष्ट असू शकतात. तुम्ही फक्त लिंबूवर्गीय साले ड्रेनेज पाईप जवळ कापडाने बांधू शकता, कुठेतरी टांगू शकता. जेणेकरून ते हळूहळू सुकते आणि त्याच्या सुगंधाने स्वयंपाकघर किंवा बाथरूमच्या पाईपमधून येणारा वास थांबतो.
डिशवॉश डिर्टजंट
ड्रेनेज पाईपमध्ये 1 कप डिटर्जंट घाला आणि 2-3 मिनिटांनंतर उकळते पाणी घाला. जर पाईप खूप जाम असेल तर प्लंजर वापरला जाऊ शकतो. या पद्धतीचा वापर करून तुमचा ड्रेनेज पाईप लवकर साफ करता येतो.
वॉशिंग सोडा
अनेकदा साफसफाईसाठी बेकिंग सोडा वापरण्याची शिफारस केली जाते. सोडियम कार्बोनेट आहे जे बहुतेक साफसफाईच्या उत्पादनांमध्ये वापरले जाते. जर ड्रेनेजची छिद्रे मोठ्या प्रमाणात बंद असतील तर बेकिंग सोडा पेक्षा वॉशिंग सोडा अधिक प्रभावी ठरेल. प्रथम आपल्या ड्रेनेज होलमध्ये उकळते पाणी घाला. नंतर एक कप वॉशिंग सोडा आणि नंतर पुन्हा एक कप उकळते पाणी घाला आणि थोडा वेळ सोडा. ब्लॉकेज बाहेर पडायला लागल्यावर, प्लंजर वापरून स्वच्छ करा. जर सिंक हळूहळू निचरा होत असेल तर ही प्रक्रिया पुन्हा करा.
कार्बोनेट ड्रिंक्स
तुम्हाला कदाचित त्याबद्दल माहिती नसेल, परंतु ड्रेनेज होल साफ करण्यासाठी कार्बोनेटेड पेये मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ शकतात. जर पाणी ड्रेनेज होलमधून हळूहळू जात असेल, म्हणजे अडथळा जास्त नसेल. अशा परिस्थितीत, आपण कार्बोनेटेड पेय वापरू शकता. ते ठेवा आणि 1 तास थांबा आणि नंतर त्यात गरम पाणी घाला.
बोरेक्स पावडर
हे बाजारात सहज उपलब्ध आहे आणि साफसफाईच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. जर तुमच्या ड्रेनेज पाईपमध्ये थोडासा अडथळा असेल तर 3-4 चमचे बोरॅक्स पावडर घाला आणि काही मिनिटे राहू द्या, नंतर त्यावर गरम पाणी घाला.