खोकला-सर्दी सतत असते; रामदेव बाबा सांगतात ६ उपाय, छातीतला कफ पातळ होईल पटकन
Updated:January 1, 2024 16:14 IST2024-01-01T15:50:18+5:302024-01-01T16:14:33+5:30
Ramdev Baba tells 6 remedies to remove phlegm from lung : रामदेव बाबा सांगतात की, फुफ्फुसं निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी दीर्घश्वास फायदेशीर ठरतो.

अनेकदा फुफ्फुसांमध्ये इतके कफ, म्यूकस साचतो की ते बाहेर काढणं कठीण होतं. फुफ्फुसांना डिटॉक्ट करण्याची आवश्यकता असते. फुफ्फुसं डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करू शकता. वाढतं प्रदूषण, स्मोकिंग आणि संक्रमणामुळे फुफ्फुसांचे सर्वात जास्त नुकसान होते. (Effective Tips to Detox Lungs and Make them Strong)
डब्ल्यूएचओनुसार वायू प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने दर वर्षी ४.३ मिलियन मृत्यू होतात. योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी फुफ्फुसांना मजबूत बनवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.(How to get Rid Of Phlem Causes and Remedies)
दीर्घश्वास घ्या
रामदेव बाबा सांगतात की, फुफ्फुसं निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी दीर्घश्वास फायदेशीर ठरतो. वायुमार्ग उघडल्याने शरीरातील विषारी पदार्थ कमी होतात. फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही फुगे फुगवू शकता. फुगे फुगवणं हा फुफ्फुसं चांगली ठेवण्याचा चांगला उपाय आहे. ज्यामुळे श्वासांचे विकार उद्भवत नाहीत.
जॉगिंग करा
फुफ्फुसांमध्ये साचलेली घाण दूर करण्यासाठी फुफ्फुसांना मजबूत करण्यासाठी तुम्ही जॉगिंग करू शकता. यासाठी आधी हळू त्यानंतर वेग वाढवून जॉगिंग करा. यामुळे वजन नियंत्रणात राहील आणि श्वासांचे विकारही उद्भवणार नाहीत.
आलं आणि लसणाची पेस्ट
आलं, लसूण कांद्याची पेस्ट बनवून छातीवर व्यवस्थित लावा. सुकल्यानंतर यावर एक पट्टी लावा. यामुळे रेस्परेटरी ट्रॅक्ट मजबूत होतो. फुफ्फुसांची कार्यक्षमताही सुधारते.
स्पायरोमीटरचा वापर
स्पायरोमीटर एक असं उपकरण आहे ज्याद्वारे श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची गती मोजली जाते. दीर्घश्वास घेतल्यानंतर श्वास सोडण्यासाठी लागणारा वेळही यात ट्रॅक केला जातो. मात्रा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा वापर करा.
शंख वाजवा
फुफ्फुसांच्या मजबूतीसाठी यापेक्षा दुसरा चांगला उपाय नाही. तुम्ही रोज सकाळी शंख वाजवू शकता. शंख वाजवल्याने फुफ्फुसांना मजबूती मिळते आणि श्वसनाचे विकारही उद्भवत नाहीत.