महिला आणि पुरुषांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाची पाहा मुख्य कारणं, अनेकांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न राहतं अधुरं!

Updated:April 1, 2025 16:52 IST2025-04-01T13:30:38+5:302025-04-01T16:52:00+5:30

Reasons for infertility : ही समस्या कशामुळे होते याचा फार कुणी विचारच करत नाहीत. जर या समस्येची योग्य कारणं माहीत असतील तर योग्य ते उपचार करून आई-वडील होण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं.

महिला आणि पुरुषांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाची पाहा मुख्य कारणं, अनेकांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न राहतं अधुरं!

Reasons for infertility : इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या समस्येने केवळ पुरूषच नाही तर महिलाही पीडित आहे. नियमितपणे असुरक्षित संबंधानंतरही गर्भधारणा होत नसल्यानं, आई-वडील होण्याची इच्छा पूर्ण होत नसल्यानं अनेक लोक चिंतेत आहेत. बाळ व्हावं म्हणून ते वेगवेगळ्या उपचारांवर लाखो रूपये खर्च करतात. पण तरीही त्यांना यश मिळत नाही. पण ही समस्या कशामुळे होते याचा फार कुणी विचारच करत नाहीत. जर या समस्येची योग्य कारणं माहीत असतील तर योग्य ते उपचार करून आई-वडील होण्याचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकतं. अशात या समस्येची काही मुख्य कारण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

महिला आणि पुरुषांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाची पाहा मुख्य कारणं, अनेकांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न राहतं अधुरं!

वेगवेगळे हार्मोन जसे की, अ‍ॅस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन यांच्या उत्पादनात काही अडचणी निर्माण झाल्यावर महिला असो वा पुरूष यांच्यात वंध्यत्वाची समस्या निर्माण होते.

महिला आणि पुरुषांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाची पाहा मुख्य कारणं, अनेकांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न राहतं अधुरं!

हार्मोनमध्ये असंतुलन आणि पोषक आहाराची कमतरता यामुळेही महिलांमध्ये स्त्रीबीजांची निर्मिती कमी होते. तर पुरूषांमध्ये कमजोर शुक्राणू तयार होण्याचं कारण ठरते. त्यामुळे आहारात वेगवेगळ्या भाज्या, फळं, धान्यांचा समावेश करावा.

महिला आणि पुरुषांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाची पाहा मुख्य कारणं, अनेकांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न राहतं अधुरं!

रोज मद्यपान आणि धुम्रपान केल्यामुळंही स्त्रीबीजांच्या निर्मितीवर आणि पुरूषांमध्ये शुक्राणूांच्या निर्मीतीवर प्रभाव पडतो. धुम्रपानामुळे पुरूषांमध्ये शुक्राणू कमी आणि कमजोर तयार होतात. ज्यामुळे वंध्यत्वाची समस्या होते.

महिला आणि पुरुषांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाची पाहा मुख्य कारणं, अनेकांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न राहतं अधुरं!

वाढता कामाचा ताण, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यामुळे महिला असो वा पुरूष पीडित राहतात. ज्यामुळे ते सतत चिंतेत आणि तणावात असतात. चिंता-तणाव वाढला की, शरीरात चिंता वाढणारे हार्मोन्स कॉर्टीसोलचं प्रमाण अधिक वाढतं. ज्यामुळे महिलांच्या स्त्रीबीजांच्या निर्मितीत आणि पुरूषांच्या शुक्राणूंच्या निर्मितीत अडथळा निर्माण होतो. सतत चिंता आणि तणाव देखील वंध्यत्वाचं कारण ठरतं. झोपेची कमतरता देखील चिंता आणि तणाव वाढण्याचं कारण ठरते.

महिला आणि पुरुषांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाची पाहा मुख्य कारणं, अनेकांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न राहतं अधुरं!

काही औषधं आणि आयुर्वेदिक उपचार देखील प्रजनन क्षमतेला प्रभावित करू शकतात. त्यामुळे कोणतीही औषधं घेण्याआधी डॉक्टरांशी बोललं पाहिजे. तसेच वातावरणात वाढत असलेले विषारी पदार्थ, हवेची खराब झालेली गुणवत्ता, रसायनं यामुळेही वंध्यत्व येण्याचा धोका असतो.

महिला आणि पुरुषांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाची पाहा मुख्य कारणं, अनेकांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न राहतं अधुरं!

प्रजनन क्षमतेला प्रभावित करणाऱ्या काही कंडिशन्सची नियमितपणे टेस्ट करणं देखील महत्वाचं असतं. पेल्विक इन्फ्लेमेटरी डिजीज (पीआयडी), एंडोमेट्रियोसिस आणि सर्वायकल कॅन्सरसारख्या कंडिशन वंध्यत्वाचं कारण ठरतात. तसेच काही आनुवांशिक समस्या असेल त्यामुळेही वंध्यत्व येऊ शकतं.

महिला आणि पुरुषांमध्ये वाढणाऱ्या वंध्यत्वाची पाहा मुख्य कारणं, अनेकांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न राहतं अधुरं!

जास्त प्रमाणात फिजिकल अॅक्टिविटी किंवा व्यायाम यामुळेही व्यक्तीची प्रजनन क्षमता कमजोर होऊ शकते. जास्त व्यायाम केल्यास महिलांच्या मासिक पाळीमध्ये समस्या होऊ शकते. तसेच पुरूषांच्या अंडकोषाजवळ उष्णता वाढू शकते. ज्यामुळे शुक्राणूंच्या उत्पादनावर प्रभाव पडतो. तसेच सुस्त जीवनशैलीमुळे देखील प्रजनन क्षमतेवर प्रभाव पडतो.