रोज घासूनही दात पिवळट दिसतात; २० रूपयात मिळवा पांढरेशुभ्र दात, हा घ्या आयुर्वेदीक उपाय

Published:December 22, 2022 01:42 PM2022-12-22T13:42:45+5:302022-12-22T14:02:16+5:30

रोज घासूनही दात पिवळट दिसतात; २० रूपयात मिळवा पांढरेशुभ्र दात, हा घ्या आयुर्वेदीक उपाय

शरीराच्या इतर अवयवांची जशी आपण काळजी घेतो त्याचप्रमाणे दातांच्या आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. अन्यथा दातांवर पिवळट थरा जमा होतो. दातांवर पिवळटपणा येणं काही आजार नसला तरी दात आणि हिरड्यांच्या गंभीर समस्या यामुळे उद्भवतात. (How to get white teeth)

रोज घासूनही दात पिवळट दिसतात; २० रूपयात मिळवा पांढरेशुभ्र दात, हा घ्या आयुर्वेदीक उपाय

पिवळ्या दातांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. दात स्वच्छ करण्यासाठी आणि अधिक चमकदार बनण्यासाठी खाण्यापिण्यात काही बदल करायला हवेत. दिवसातून २ वेळा ब्रश करायला हवं. काही घरगुती उपाय तुम्हाला पिवळट दातांपासून सुटका मिळवण्यास मदत करू शकतात.

रोज घासूनही दात पिवळट दिसतात; २० रूपयात मिळवा पांढरेशुभ्र दात, हा घ्या आयुर्वेदीक उपाय

नोएड सेक्टर २७ येथिल डॉक्टर कपिल त्यागी यांनी सांगितलं की, दातांचा पिवळटपणा घालवण्यासाठी जवळपास २ ते ४ हजारांचा खर्च येते. याव्यतिरिक्त बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांमध्ये काही केमिकल्स असतात. पिवळ्या दातांना पांढरे बनवण्यासाठी आयुर्वेदीक घरगुती उपचार तुमच्याही फायदेशीर ठरू शकतात.

रोज घासूनही दात पिवळट दिसतात; २० रूपयात मिळवा पांढरेशुभ्र दात, हा घ्या आयुर्वेदीक उपाय

ही पावडर बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा काळं मीठ, एक चमचा लवंग पावडर, एक टीस्पून दालचिनी पावडर, एक चमचा ज्येष्ठमध, वाळलेली कडुलिंबाची पाने आणि पुदिन्याची वाळलेली पाने लागतील. वर नमूद केलेले सर्व साहित्य बारीक करून बारीक पावडर बनवा. ही पावडर तुम्ही डब्यात साठवून ठेवू शकता.

रोज घासूनही दात पिवळट दिसतात; २० रूपयात मिळवा पांढरेशुभ्र दात, हा घ्या आयुर्वेदीक उपाय

एक चमचा ही पाऊडर घ्या आणि तळहातावर ठेवा. आता ब्रशच्या मदतीने दात पावडरने स्वच्छ करा. पाण्याने तोंड स्वच्छ करा. आठवडाभर असे केल्याने तुमच्या दातांच्या रंगात काही बदल दिसून येतील.

रोज घासूनही दात पिवळट दिसतात; २० रूपयात मिळवा पांढरेशुभ्र दात, हा घ्या आयुर्वेदीक उपाय

सैंधव मीठ दातांना नैसर्गिकरित्या पांढरे बनवते आणि हिरड्यांच्या आरोग्यात सुधारणा होते. संवेदनशील दात असलेल्यांसाठी ही पावडर फायदेशीर आहे. यातील दालचिनी आणि लवंग यामुळे दातांच्या वेदना दूर होतात.

रोज घासूनही दात पिवळट दिसतात; २० रूपयात मिळवा पांढरेशुभ्र दात, हा घ्या आयुर्वेदीक उपाय

नियमित स्वरूपात दातांचे चेकअप करा. दातांना दिवसातून दोनवेळा ब्रश करा. जास्तवेळा ब्रश केल्यानं दातांचे इनेमल खराब होऊ शकतं. मीडियम किंवा हार्ड ब्रशऐवजी सॉफ्ट ब्रशचा वापर करा. ब्रशचा वापर करताना स्ट्रोक वर्टिकल असायला हवा. तुम्ही ऑटोमेटिक ब्रशसुद्धा वापरू शकता. यामुळे दात स्वच्छ करणं सोपं होतं.