सकाळी की रात्री जेवणानंतर कधी चालल्याने वजन पटकन कमी होतं? फिटनेससाठी तज्ज्ञ सांगतात... By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 8:57 PM 1 / 7देशभरातील लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा गात आहे. लाईफस्टाईल, व्यायाम, योगा, वॉक यामुळे जीवनशैलीमुळे लोक स्वत:ला एक्टिव्ह ठेवू लागले आहे. अनेकजण ब्रिस्क वॉक करून स्वत:ला एक्टिव्ह ठेवतात. तर काहीजण जीमला जाऊन घाम गाळतात. 2 / 7सकाळी चालायचं की संध्याकाळी याबाबत अनेकांना कन्यफ्यूजन असते. दिल्लीतील कार्डिओलॉजी कंसल्टंट डॉ. रवि प्रकाश सांगतात की सकाळी की संध्याकाळी कधी वॉक केल्याने जास्तीत जास्त फायदे मिळतात.3 / 7सकाळी वॉक केल्यानं संपूर्ण दिवसाची सुरूवात चांगली होते. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरूवात व्यायामाने करता तेव्हा पोटात असे काही केमिकल्स निघतात ज्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो.4 / 7सकाळी वॉक केल्याने कमकुवत मेटाबॉलिझ्म चांगला होतो. सकाळच्या ऊन्हात व्हिटामीन डी मिळते. सकाळी वॉक केल्यानं संपूर्ण शरीर उर्जावान राहते. याशिवाय वॉक केल्यानं वजन कंट्रोल होण्यासही मदत होते. 5 / 7रवि प्रकाश सांगतात संध्याकाळी वॉक केल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. संध्याकाळी चालल्याने दिवसभरातील ताणतणाव कमी होण्यासाठी मदत होते. 6 / 7संध्याकाळी वॉक केल्यानं चांगली झोप येते.जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर सकाळी चाला. संध्याकाळी वेळ मिळाला तर संध्याकाळी चाला पण वॉक नियमित करा. सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम चालायला वेळ काढू नका.7 / 7लंच ब्रेक असेल तेव्हा १५ मिनिटं फिरा. ऑफिसमध्ये अर्धा तास आधी उठून थोडावेळ फिरा. लिफ्टऐवजी शिड्यांचा वापर करा. आणखी वाचा Subscribe to Notifications