जेवण करून लगेचच शतपावली करता? थांबा.. 'हे' वाचा, आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम
Updated:February 8, 2025 09:05 IST2025-02-08T09:03:24+5:302025-02-08T09:05:01+5:30

ज्या लोकांना दिवसभर व्यायाम करायला वेळ नसतो, असे काही लोक रात्री जेवण झाल्यानंतर हमखास चालायला बाहेर पडतात.
जेवण झाल्यानंतर शतपावली करायची असते हा एक नियम आपल्याला माहिती आहे. पण शतपावली म्हणजे शंभर पावलंच. पण एवढंच न चालता अनेकजण त्यापेक्षाही कित्येक पट जास्त चालतात.
खरंतर जेवण झाल्यानंतर काही वेळ कोणताही व्यायाम करू नये अगदी जास्त चालण्याचा व्यायाम करणेही टाळावे.
म्हणूनच जर तुम्ही जेवणानंतर लगेच चालायला जात असाल आणि शतपावलीपेक्षाही खूप जास्त चालत असाल तर ते तुमच्या तब्येतीसाठी योग्य नाही, अशी माहिती डॉक्टरांनी healyourselfwith_manasikrishna या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
यामध्ये आयुर्वेदतज्ज्ञ असं सांगत आहेत की जेवण झाल्यानंतर तुम्ही लगेच चालत असाल आणि खूप जास्त वेळ चालत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरातील वात दोषाचा प्रकोप होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला अपचन, कॉन्स्टिपेशन, गॅसेस असे त्रास होऊ शकतात.
त्यामुळे जेवण झाल्यानंतर लगेच चालू नका. काही मिनिटांचा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर चाला. पण फक्त शतपावलीच करा आणि ती ही अगदी सावकाशपणे करा.