अपचनाचा त्रास होणार-पोट बिघडणार हे सांगणारी ४ लक्षणं- ओळखा तुमची पचनशक्ती कशी आहे?
Updated:September 2, 2024 19:02 IST2024-09-01T09:03:43+5:302024-09-02T19:02:21+5:30

तुमची पचनशक्ती कशी आहे, यावर तुमचे बरेचसे आरोग्य अवलंबून असते. त्यामुळे आपली पचनशक्ती नेहमी उत्तम असली पाहिजे.
आपली पचनशक्ती नेमकी कशी आहे, हे कसं ओळखायचं, याविषयीची माहिती drvaraayurveda या इन्स्टाग्राम पेजवर डॉक्टरांनी शेअर केली आहे. त्यांनी ५ लक्षणं सांगितली आहेत. ती तुमच्यात दिसली तर तुमची पचनशक्ती उत्तम आहे हे ओळखावं...
पचनशक्ती चांगली असण्याचं पहिलं लक्षण म्हणजे तुम्हाला कधीही करपट ढेकर न येणे. किंवा क्वचित कधीतरी तसा त्रास होणे.
सकाळी उठल्यावर लगेचच पोट साफ होणे. त्यासाठी कधीही कोणताही त्रास न होणे.
पोट गच्च झाल्यासारखं न वाटणे. नेहमी हलकं वाटणे.
भूक, तहान नियमितपणे लागणे. भूकच लागत नाही, पाणी प्यावेच वाटत नाही, असा त्रास न होणे.