Join us

सतत अर्ध डोकं ठणकतं, मायग्रेनचा त्रास? ६ आयुर्वेदिक उपाय, डॉक्टर सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2023 17:29 IST

1 / 8
१. मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांना सततच डोकेदुखीचा त्रास होतो. खूप आवाज, प्रखर लाईट किंवा अन्य कशाचा त्रास होऊन त्यांचा त्रास वाढेल काही सांगता येत नाही. त्यामुळेच असा त्रास असणाऱ्यांनी काही आयुर्वेद उपचार वेळीच करून घ्यावेत, असं आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
2 / 8
२. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जडेजा यांनी त्यांच्या सोशल मिडियावर याविषयी माहिती शेअर केली असून त्यामध्ये मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी काही उपाय सुचविले आहेत.
3 / 8
३. यामध्ये त्यांनी शिरोलेप आणि पहिला उपाय सांगितला आहे. त्या म्हणतात की या उपायाने मायग्रेनचा त्रास तर कमी होतोच, पण मानसिक ताण येऊन डोकेदुखी होत असेल, तर ती ही कमी होते. यामध्ये काही वनस्पतींचा लेप करून तो काही काळासाठी डोक्यावर ठेवला जातो.
4 / 8
४. त्यांनी सुचवलेला दुसरा उपाय म्हणजे शिरोधारा. या उपायामध्ये आपल्या कपाळावरच्या काही रक्तवाहिन्यांवर सलगपणे तेलाची धार सोडली जाते. तेलाच्या दाबामुळे तिथे कंपने निर्माण होतात. त्यामुळे आपले मन, डोकं शांत होण्यास मदत होते.
5 / 8
५. यासोबतच करता येण्यासारखे काही घरगुती उपाय म्हणजे मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यावर शक्यतो घरातले सगळे दिवे बंद करा. अगदी मंद उजेडात थोडा वेळ डोळे मिटून बसा. तसेच त्यावेळी कोणताही मोठा आवाज ऐकू नका.
6 / 8
६. मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यावर काही जण डोक्यावर बर्फ ठेवण्याचा किंवा गरम पाण्याच्या पिशवीने डाेके, मान शेकण्याचा सल्लाही देतात.
7 / 8
७. आंघोळ केल्यानंतर मायग्रेनचा त्रास कमी होतो, असंही काही जण सांगतात. कारण यामुळे अनेक मसल्स रिलॅक्स व्हायला मदत होते.
8 / 8
८. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी अगदी अर्धा कप कॉफी घ्यायलाही हरकत नाही. त्यामुळेही आराम वाटेल.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपाय