दिवसभर उभ्याने काम करून पाय दुखतात- पाठ ठणकते? १ खास उपाय, झटपट पळेल थकवा
Updated:February 7, 2025 16:28 IST2025-02-06T19:17:09+5:302025-02-07T16:28:09+5:30

बहुतांश महिला स्वयंपाक घरात ओट्याजवळ तासनतास उभं राहून काम करत असतात.
याशिवाय त्यांची रोजची कित्येक कामंही उभं राहूनच करायची असतात. त्यामुळे बऱ्याच जणी दिवसभर तर उत्साहाने काम करतात. पण नंतर मात्र रात्री त्यांचे पाय अगदी गळून जातात.
पाठ- कंबरसुद्धा आखडून जाते. शिवाय असं पाठ, कंबर, पाय दुखत असतील तर शांत झोपसुद्धा येत नाही. म्हणूनच बहुतांश महिलांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करावा, याविषयीची माहिती डॉक्टरांनी healtthguru या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
यामध्ये ते सांगतात की दररोज रात्री झाेपण्यापुर्वी एक वाटी घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा तूप आणि अर्धा चमचा खोबरेल तेल घालून ते दोन्ही पदार्थ एकत्रित थोडे कोमट करून घ्या.
आता या तेल- तुपाच्या मिश्रणात कापूस घाला आणि तो तुमच्या पायाच्या नखांच्या टोकावर घासा. अशा पद्धतीने कापूस घासावा की जेणेकरून त्यातलं तेल- तूप नख आणि त्वचेच्या मधली जी जागा असेल तिथे जाईल. यानंतर दोन्ही हातांनी बोटांना पाच मिनिटांसाठी मसाज करा.
हा उपाय नियमितपणे केल्यास रात्री झोप चांगली येते..
शिवाय पाय, पाठ, कंबरदुखी कमी होऊन शरीरातला थकवा कमी होतो.