जरा धावलं की लगेच दम लागतो? १० पदार्थ रोज खा, स्टॅमिना वाढेल- फुफ्फुसंही राहतील निरोगी Published:July 22, 2023 08:34 AM 2023-07-22T08:34:00+5:30 2023-07-22T08:35:02+5:30
Stamina boosting foods : सफरचंदांमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. सफरचंद तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्ही ऊर्जावान राहता. पावसाळ्यातच्या दिवसात अनेकांना दम लागतो आणि अशक्तपणा, थकल्यासारखं वाटतं अशा तक्रारी अनेकाच्या असतात. अशा स्थितीत सतत झोपून राहावं वाटतं. थकवा दूर घालवण्यासाठी काही पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केला तर स्टॅमिना वाढेल आणि तुम्ही दिवसभरात अधिकाधिक कामं करू शकाल. (6 foods to increase stamina and boost energy)
ड्रायफ्रुट्स
स्टॅमिना वाढवण्यासाठी ड्रायफ्रुट्स खाणं आरोग्यदायी मानले जाते. यात फायबर, हेल्दी फॅट्स प्रोटीन्स आणि जीवनसत्त्वे असतात. नट्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स भरपूर असतात, ज्यामुळे स्टॅमिना आणि रक्ताभिसरण देखील वाढते.(Stamina boosting foods)
ब्राऊन राईस
पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राइसमध्ये स्टार्च कमी आणि फायबर जास्त असते. यामुळे तुमची भूक दीर्घकाळ भागते. तांदूळ सारखे उच्च कार्बोहायड्रेट पदार्थ स्नायू आणि ऊतींना आराम देण्यास आणि स्टॅमिना वाढवण्यास मदत करतात.
केळी
केळ्यामध्ये मॅग्नेशियम असते ज्यामुळे तुमची उर्जा वाढते, ज्यामुळे तुमचा स्टॅमिना देखील वाढू शकतो. वजन वाढवण्यासाठीही केळी गुणकारी आहे.
पालेभाज्या
स्टॅमिना वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे फार महत्वाचे आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि आवश्यक पोषक घटक असतात ज्यात लोहाचे प्रमाण जास्त असते. लोहाच्या कमतरतेमुळे थकवा येतो.
सफरचंद
सफरचंदांमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. सफरचंद तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्ही ऊर्जावान राहता.
चपाती
शरीराला उर्जेसाठी कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता असते. कार्बोहायड्रेट्स त्वचेला पोषण देतात. म्हणून आहारात चपाती, भाकरीचा समावेश करा.