पोट नेहमीच गुबारलेलं असतं, गॅसेसचाही त्रास? ५ सोपे उपाय- अपचनाचे सगळेच त्रास थांबतील

Updated:April 14, 2025 16:10 IST2025-04-13T09:16:27+5:302025-04-14T16:10:06+5:30

पोट नेहमीच गुबारलेलं असतं, गॅसेसचाही त्रास? ५ सोपे उपाय- अपचनाचे सगळेच त्रास थांबतील

काही जणांना नेहमीच अपचन, ॲसिडीटी असे त्रास होतात. पोट फुगल्यासारखं होतं किंवा मग सतत गॅसेसचा त्रास होतो. काही जणांना नेहमीच पोट साफ होण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो..

पोट नेहमीच गुबारलेलं असतं, गॅसेसचाही त्रास? ५ सोपे उपाय- अपचनाचे सगळेच त्रास थांबतील

असे कोणतेही त्रास तुम्हाला असतील तर त्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येतील याविषयीची माहिती आयुर्वेदतज्ज्ञांनी drvaraayurveda या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

पोट नेहमीच गुबारलेलं असतं, गॅसेसचाही त्रास? ५ सोपे उपाय- अपचनाचे सगळेच त्रास थांबतील

त्यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे जेवणाची सुरुवात करण्यापुर्वी एक टीस्पून ओवा तोंडात टाका आणि अगदी बारीक चावून खा. यामुळे अन्नपचन चांगलं होण्यास मदत होते.

पोट नेहमीच गुबारलेलं असतं, गॅसेसचाही त्रास? ५ सोपे उपाय- अपचनाचे सगळेच त्रास थांबतील

जेवणादरम्यान आणि जेवणानंतर बडिशेपाचं पाणी प्या. यामुळेही पचनाच्या बऱ्याच तक्रारी दूर होतील. बडिशेपाचं पाणी पिण्यासाठी १ चमचा बडिशेप १ ग्लास पाण्यात ७ ते ८ तास भिजत घालावी.

पोट नेहमीच गुबारलेलं असतं, गॅसेसचाही त्रास? ५ सोपे उपाय- अपचनाचे सगळेच त्रास थांबतील

अपचनाचा त्रास ज्यांना असतो त्यांनी नेहमी गरम अन्न खावे. थंड, शिळे अन्न खाल्ल्यास अपचनाच्या तक्रारी वाढतात. तसेच कच्चे पदार्थ म्हणजेच सॅलेड खाणेही टाळावे.

पोट नेहमीच गुबारलेलं असतं, गॅसेसचाही त्रास? ५ सोपे उपाय- अपचनाचे सगळेच त्रास थांबतील

प्रत्येक घास बारीक चावून खावा. घाईघाईने अन्न चावून खाल्ल्यास अपचनाच्या तक्रारी वाढत जातात.