Join us   

नाक चोंदलंय ? श्वास घ्यायला त्रास होतोय, ७ घरगुती उपाय, मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2022 12:48 PM

1 / 8
थंडीचा महिना सुरु झाला. हिवाळ्यातील गुलाबी हवा प्रत्येकाला आवडते. मात्र, थंडीच्या दिवसात शरीरात अनेक गंभीर आजार उद्भवतात. स्कीन कोरडी पडते, केस गळतात, यासह सर्दी, खोकला व तापापासून व्यक्ती हैराण होतो. यादिवसात सर्दीमुळे अनेकांना नाक बंदच्या समस्याला सामोरे जावे लागते. ही समस्या विशेषतः रात्रीच्या वेळी प्रचंड वाढते. नाक बंदमुळे नीट श्वास घेता येत नाही. त्यामुळे नीट झोप देखील लागत नाही. आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. नाक बंद झाल्यामुळे मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही, त्यामुळे मेंदूच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. जर आपल्यला नाक बंदपासून सुटका मिळवायची असेल. तर, काही घरुगुती उपायांना फॉलो करून नाक बंदपासून आराम मिळवा.
2 / 8
नाक बंदसाठी योग्य उपाय म्हणजे स्टीम घेणे. स्टीम घेऊन आपण बंद झालेल्या नाकापासून आराम मिळवू शकता. वाफ घेण्यासाठी वाफेचं यंत्र वापरा अथवा एका भांड्यात गरम पाणी घेऊन वाफ घ्या. डोळे मिटून पाण्याची वाफ घेण्याचा प्रयत्न करा. याने बंद झालेल्या नाकाला आराम मिळेल. यासह चेहरा देखील चमकेल.
3 / 8
नाक बंदची समस्या अधिक जाणवत असेल, तर मासालेदरे अन्न खा. मसालेदार अन्न खाल्ल्याने बंद नाकाला उघडण्यास मदत मिळेल. शरीराला मसालेदार अन्नापासून लांब ठेवावे असे म्हटले जाते. मात्र, बंद नाक झालेल्या समस्येसाठी हा रामबाण घरगुती उपाय आहे.
4 / 8
सर्दी, खोकला अथवा ताप आल्यावर आपण गरम पाणी पितो. थंडीच्या दिवसात नियमित थंड पाणी पिले पाहिजे. थंड पाणी पिल्याने सर्दी आणि खोकलापासून आराम मिळतो. बंद झालेले नाक उघडण्यासाठी कोमट पाणी खूप फायदेशीर आहे. यात आपण मध अथवा आल्याचा रस टाकून देखील पिऊ शकता.
5 / 8
बंद नाकासाठी प्रभावी उपाय म्हणजे नेजल स्प्रे. नेजल स्प्रे वापरल्याने बंद झालेले नाक पुन्हा उघडण्यास मदत होते. मात्र, नेजल स्प्रे वापरण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
6 / 8
बंद झालेलं नाक उघडण्यासाठी कापूर खूप उपयुक्त आहे. कापराचा वास घेतल्याने बंद झालेलं नाक उघडण्यास मदत होईल.
7 / 8
बंद नाक उघडण्यासाठी, एक छोटासा व्यायाम करा आपले नाक बंद करा आणि डोके थोडेसे मागे टेकवा. या दरम्यान, आपला श्वास रोखून ठेवा. मग पुढे येऊन श्वास घेण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम केल्याने नक्कीच दिलासा मिळेल.
8 / 8
बंद झालेल्या नाकासाठी हळद गुणकारी आहे. हळदीतील कर्क्युमिन नावाचा घटक अनुनासिक रक्तवाहिन्यांची जळजळ कमी करतो. एक ग्लास कोमट दुधात एक चमचा हळद टाकून प्या. थंडीत हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीराला भन्नाट फायदे मिळतात.
टॅग्स : थंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्स