शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..

Published:November 19, 2024 09:10 AM2024-11-19T09:10:22+5:302024-11-19T09:15:01+5:30

शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..

Vitamin B12, D3 ची कमतरता हल्ली बऱ्याच जणांना जाणवते. आपली बदललेली जीवनशैलीसुद्धा यासाठी खूप जबाबदार आहे. म्हणूनच आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मानसी यांनी सांगितलेली ही खास माहिती वाचायला हवी. अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने घेतलेल्या मुलाखतीत डॉ. मानसी यांनी शरीरात व्हिटॅमिन बी १२ आणि डी ३ कमी असेल तर कोणती लक्षणं जाणवतात, याविषयी माहिती दिली आहे. (how to identify the deficiency of Vitamin B12, D3?)

शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..

शरीरात व्हिटॅमिन डी ३ कमी असेल तर जाणवणारं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे केस खूप जास्त गळायला लागतात.(symptoms of Vitamin B12, D3 deficiency)

शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..

नेहमीच खूप थकल्यासारखं वाटतं. कधीच कोणत्या कामात उत्साह वाटत नाही. सर्दी, खोकला, ताप येणं हे खूप वारंवार होतं.

शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..

व्हिटॅमिन डी ३ कमी असेल तर जसं हाडांच्या समस्या वाढतात, तसंच दातांच्या तक्रारीसुद्धा वाढायला लागतात.

शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..

व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर हातापायांना वारंवार मुंग्या यायला लागतात.

शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..

वारंवार तोंड येत असेल किंवा तोंडात, जिभेवर फोड येऊन, चट्टे पडून जखमा होत असतील तर ते व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता सांगणारं एक लक्षण आहे.

शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यामुळे अधूनमधून चक्कर आल्यासारखं होतं.

शरीर पोखरण्याआधीच लक्षात घ्या व्हिटॅमिन बी -१२, डी- ३ ची लक्षणं कोणती! तब्येतीला जपायचं तर..

नैराश्य येणं, एकटेपणा वाटणं, चिडचिड होणं, मूड स्विंग ही काही व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता सांगणारी लक्षणं आहेत.