Join us

दातांचा पिवळेपणा कमी करताता 'ही' पानं; रोज १ पान चावून खा- तोंडाची दुर्गंधीही जाईल पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 17:34 IST

1 / 7
दांताचा पिवळेपणा दूर करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपायांचा वापर केला जातो. पण या पानांचा वापर पारंपारीक पद्धतीने केल्यास तोंडाची साफ-सफाई होण्यास आणि दातांचा रंग सुधारण्यास मदत होईल. (Teeth Whitening Home Remedies)
2 / 7
कडुलिंबाच्या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी फंगल गुण असतात ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरियाज आणि फंगसशी लढण्यास मदत होते. दातांमध्ये कॅव्हिटी आणि हिरड्यांचे आजार होत नाहीत. नियमित याचा वापर केल्यानं प्लाक आणि टार्टर कमी होते. ज्यामुळे दांत पांढरे होतात.
3 / 7
जांभळाच्या पानांत एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी मायक्रोबियल गुण असतात. ज्यामुळे हिरड्यांची सूज कमी होते. तोंडातील बॅक्टेरियांशी लढता येतं नियमित हा उपाय केल्याने दात स्वच्छ राहतात.
4 / 7
तुळशीच्या पानांमध्ये एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात. तुळस दातांवरील डाग हटवण्यास मदत करते. ज्यामुळे दात स्वच्छ आणि साफ दिसतात.
5 / 7
तमालपत्र पारंपारीक स्वरूपात दातांना पांढरे करण्यासाठी वापरले जाते. ज्यामुळे तोंड साफ होण्यास मदत होते. सुकलेलं तमालपत्र वाटून त्याची पावडर बनवून घ्या. यात थोडी संत्र्याच्या सालीची पावडर मिसळून दात घासून स्वच्छ करा.
6 / 7
पुदिन्याच्या पानांत एंटी बॅक्टेरियल गुण असतात. ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते आणि श्वासांचा दुर्गंध येत नाही. ज्यामुळे दात पांढरेशुभ्र दिसतात. ताजी पुदिन्याची पानं चावून खाल्ल्याने दात आणि हिरड्या स्वच्छ होण्यास मदत होते.
7 / 7
रोज दात दोनवेळा स्वच्छ घासत जा. दोनवेळा दात घासण्याची सवय ठेवल्याने दातांना किड लागण्याची शक्यता कमी असते.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल